आता थेट सॅटेलाईटवरून मिळणार स्मार्टफोन्स सर्व्हिस! SpaceX ने अवकाशात सोडले 20 स्टारलिंक उपग्रह

SpaceX कंपनीने मार्चमध्ये 22 उपग्रहांची तुकडी प्रक्षेपित केली होती.
गेल्या आठवड्यात मंगळवारी आणखी 20 स्टारलिंक उपग्रह अवकाशात पाठवले गेले.
काही उपग्रह थेट स्मार्टफोनवर सेवा वितरीत करतील, असे सांगण्यात येत आहे.
SpaceX गेल्या काही काळापासून स्टारलिंक उपग्रहांना अंतराळात पाठविण्याचे काम करत आहे. कंपनीने मार्चमध्ये 22 उपग्रहांची तुकडी प्रक्षेपित केली होती. आता गेल्या आठवड्यात मंगळवारी आणखी 20 स्टारलिंक उपग्रह अवकाशात पाठवण्यात आले. यापैकी 13 डायरेक्ट-टू-सेल आहेत, जे स्मार्टफोनवर थेट सेवा वितरीत करतील, असे सांगण्यात येत आहे.

SpaceX ने अवकाशात 20 स्टारलिंक उपग्रह सोडले
एलॉन मस्कची कंपनी फाल्कन-9 रॉकेटच्या मदतीने कॅलिफोर्नियातील वॅन्डनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून या उपग्रहांना कक्षेत पाठवत आहे. फाल्कन-9 रॉकेट या उपग्रहांना घेऊन जाते आणि काही मिनिटांनंतर त्यांना कक्षेत सोडते. Space.com च्या मते, SpaceX ने मंगळवारी रात्री त्यांच्या स्टारलिंक इंटरनेट उपग्रहांची आणखी एक तुकडी प्रक्षेपित केली. ज्यामध्ये 13 डायरेक्ट-टू-सेल उपग्रहांसह एकूण 20 स्टारलिंक उपग्रह समाविष्ट होते.
Watch Falcon 9 launch 20 @Starlink satellites to orbit from California, including 13 with Direct to Cell capabilities https://t.co/4cpazZaDMA
— SpaceX (@SpaceX) June 8, 2024
तुमच्या माहितीसाठी सांगतो की रिपोर्टनुसार, स्टारलिंक स्पेसक्राफ्टने फ्लोरिडामधील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून फाल्कन रॉकेटचा वापर करून उड्डाण केले. फाल्कन 9 पहिला टप्पा प्रक्षेपणानंतर सुमारे 8.5 मिनिटांनी पृथ्वीवर परत आला आणि अटलांटिक महासागरात स्पेसएक्स ‘जस्ट रीड द इंस्ट्रक्शन्स’ ड्रोनशिपवर उतरला.
स्पेसएक्स मिशनच्या वर्णनानुसार, या विशेष बूस्टरचे हे 20 वे प्रक्षेपण आणि लँडिंग होते. 2024 मध्ये आतापर्यंत, SpaceX ने 58 परिभ्रमण मोहिमा सुरू केल्या आहेत. त्यापैकी 41 स्टारलिंक मेगाकॉस्टेलेशन तयार करण्यासाठी डेडिकेटेड आहेत. कंपनीने अलीकडेच जगातील सर्वात वजनदार रॉकेट स्टारशिपची टेस्टिंग देखील केली आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile