Star Explosion: जर तुम्ही अवकाशात घडणाऱ्या घटनांबद्दल उत्सुक असाल तर, आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आणली आहे. अवकाशात घडणाऱ्या घटना अनेक रहस्यांनी परिपूर्ण असतात, त्यामुळे या घटनांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता जवळपास प्रत्येक व्यक्तीला असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, आत्तापासून ते सप्टेंबर दरम्यान कधीही तुम्ही 79 वर्षांतून एकदा घडणारे काहीतरी पाहू शकता. खरं तर, एका ताऱ्याचा स्फोट होणार आहे. हा स्फोट तुम्ही पृथ्वीवरून लाईव्ह बघू शकता, असे सांगितले जात आहे. बघुयात संपूर्ण डिटेल्स-
Also Read: WhatsApp Update: नवे Speaker Spotlight फीचर लाँच आणि व्हीडिओ कॉलिंगसाठीही आले अपडेट
मागील अहवालातून पुढे आलेल्या माहितीनुसार, हा स्फोट नोवा (Nova) नामक स्टार सिस्टममध्ये होणार आहे. हा स्फोट इतका मोठा असू शकतो की, तो उघड्या डोळ्यांनी पाहिला जाऊ शकतो. अमेरिकन अंतराळ संस्था NASA ने दिलेल्या माहितीनुसार, “जेव्हा स्फोट होईल तेव्हा आकाशात एक चमक दिसेल.”
NASA च्या Meteoroid Environment Office (MEO) चे प्रमुख बिल कूक यांनी एका मुलाखतीदरम्यान संभाव्य स्फोटाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “शास्त्रज्ञांना त्याच्या या स्फोटाच्या वेळेबद्दल जास्त माहिती नाही. मात्र, जेव्हा जेव्हा ते होईल तेव्हा ते आपल्या लक्षात येईल असा दावा त्यांनी केला आहे.”
जो तारा फुटणार आहे म्हणजेच ‘नोवा स्टार’ बायनरी सिस्टमला बांधलेला आहे. अशा सिस्टममध्ये एक महाकाय तारा आणि एक पांढरा बटू तारा असतो. सध्या, मोठा तारा आपले मटेरीयलला बटु ताऱ्यावर डंप करत आहे. कारण दोन कक्षा एकमेकांच्या अगदी जवळ आल्या आहेत. मटेरियल डंपिंगमुळे बटू ताऱ्याचे तापमान वाढत जात आहे. अहवालानुसार, जेव्हा हे होईल तेव्हा त्यात थर्मोन्यूक्लियर स्फोट सुरू होईल.
हे स्फोट झाल्याने पूर्वीपेक्षा ते शेकडो पट अधिक उजळ होईल. हे उजळ खूप जास्त प्रमाणात असेल, त्यामुळे स्फोटाच्या वेळी आकाशात होणारे बदल उघड्या डोळ्यांनीही दिसू शकतात, असे वैज्ञानिकांचे मत आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, नोवा स्टार सिस्टम आपल्या विश्वातील कोरोना बोरेलिस नक्षत्रात आहे. तर, आता होणार तसा शेवटचा स्फोट 1946 मध्ये झाला होता. हा स्फोट आतापासून ते सप्टेंबरपर्यंत कधीही होण्याची शक्यता आहे. तर, ज्या ठिकाणी स्फोट होईल ते ठिकाण पृथ्वीपासून 3 हजार प्रकाशवर्षे लांब आहे. शेवटचा स्फोट 1946 मध्ये झाला होता.