पृथ्वीजवळून जाणार 210 फूट विशाल लघुग्रह 2024 LJ! पृथ्वीला आहे का धोका? Nasa ने दिली माहिती
2024 LJ लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असल्याची माहिती NASA ने दिली आहे.
2024 LJ लघुग्रहाचा आकार सुमारे 210 फूट इतका आहे.
शनिवार, 22 जून रोजी ते पृथ्वीपासून 2.1 दशलक्ष मैल अंतरावर असेल.
अंतराळ विज्ञानात रुची ठेवणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. एका ताज्या अहवालानुसार, एक मोठा लघुग्रह (Asteroid) पृथ्वीजवळून जाणार आहे. या लघुग्रहाचा आकार सुमारे 210 फूट इतका आहे, असे NASA कडून सांगण्यात आले आहे. म्हणजेच हा लघुग्रह जवळपास एका मोठ्या बोटीएवढा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2024 LJ लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार
वरील पार्श्वभूमीवर Nasa ने एक इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांनी या लघुग्रहाला ‘2024 LJ’ असे नाव दिले आहे. लघुग्रह 2024 LJ पृथ्वीपासून इतक्या जवळच्या अंतरावर जाणार आहे की, Nasa ला त्याकडे लक्ष द्यावे लागेल. मिळालेल्या माहितीनुसार, हा लघुग्रह ताशी 66,584 मैल वेगाने पुढे जाईल. शनिवार, 22 जून रोजी ते पृथ्वीपासून 2.1 दशलक्ष मैल अंतरावर असेल. या काळात शास्त्रज्ञ त्यावर लक्ष ठेवतील.
2024 LJ चा अंतराळातील प्रवास विशेषत: या फ्लायबाय दरम्यान त्याच्या आकारमानामुळे आणि पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे लक्षणीय झाले आहे. कारण पृथ्वीजवळून जाणारी कोणतीही मोठी वस्तू काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे.
लघुग्रहावर असेल वैज्ञानिकांचे लक्ष
2024 LJ सारख्या निअर अर्थ ऑब्जेक्ट्स म्हणजेच NEOs वर NASA चे लक्ष हे या खगोलीय घटना समजून घेण्याच्या आणि ट्रॅक करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, एजन्सीच्या प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिस (PDCO) ला पृथ्वीच्या कक्षेपासून 30 दशलक्ष मैलांच्या आत येणारे संभाव्य धोकादायक लघुग्रह आणि धूमकेतू ओळखण्याचे काम दिले जाते. त्यामुळे, वर सांगितल्याप्रमाणे 2024 LJ लघुग्रहाचे पृथ्वीजवळून जाणे, हे लक्षणीय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2024 LJ ज्या वेगाने प्रवास करत आहे, हा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 80 पट जास्त आहे. हा वेगानुसार लघुग्रह ताशी अंदाजे 767 मैल वेगाने प्रवास करतो. त्यानुसार 2024 LJ पृथ्वीच्या परिघाएवढे अंतर केवळ एका तासात पार करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
महत्त्वाचे:
2024 LJ शी संबंधित वरील सर्व डेटा प्रभावी असूनही NASA ने यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नसल्याची ग्वाही दिली आहे. ते सुरक्षित अंतरावर पृथ्वीजवळून जाईल, त्यामुळे कोणत्याही आघाताचा धोका नसेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile