Nasa ने दिले अपडेट! अंतराळवीर सुनीता विल्यम्सची कामगिरी विना-अडथडा सुरु, अंतराळवीरांना काहीही धोका नाही

Nasa ने दिले अपडेट! अंतराळवीर सुनीता विल्यम्सची कामगिरी विना-अडथडा सुरु, अंतराळवीरांना काहीही धोका नाही
HIGHLIGHTS

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या तीन आठवड्यांपासून अंतराळात आहेत.

एजन्सी मिशनचा कालावधी 45 वरून 90 दिवसांपर्यंत वाढविण्याचा विचार करत आहे.

अंतराळ यानामध्ये समस्या आढळून आल्यानंतर परतीचे उड्डाण एकूण तीन वेळा पुढे ढकलण्यात आले.

Nasa: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या तीन आठवड्यांपासून अंतराळात अडकले आहे. यावर अनेक चर्चा सध्या सुरु आहेत, मात्र त्यांच्या परतीची तारीख अद्याप समजलेली नाही. दोन्ही अंतराळवीर बोइंगच्या स्टारलाइनर स्पेसशिपमधून अंतराळात गेले. अवकाश स्थानकावर एक आठवडा घालवल्यानंतर तो परतणार होता, परंतु अंतराळ यानामध्ये समस्या आढळून आल्यानंतर त्याचे परतीचे उड्डाण एकूण तीन वेळा पुढे ढकलण्यात आले आहे.

5 जून रोजी प्रक्षेपित केलेल्या चाचणी उड्डाण दरम्यान बोईंग स्टारलाइनरवर हेलियम गळती आणि थ्रस्टर अपयशासह अनेक समस्या आढळून आल्या.

Also Read: Limited Time Deal! लेटेस्ट Realme 12 Pro+ 5G च्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत आणि ऑफर्स

अंतराळवीरांना धोका नाही

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या आव्हानांना न जुमानता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळात कोणताही धोका नसून दोघेही सुरक्षित असल्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे. Nasa चे व्यावसायिक क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी शुक्रवारी सांगितले की, एजन्सी मिशनचा कालावधी 45 वरून 90 दिवसांपर्यंत वाढविण्याचा विचार करत आहे.

NASA Astronauts stuck on space station due to Starliner issues: All you need to know

आम्ही तुम्हाला सांगतो की, स्टारलाइनरवर चाचणी आणि मूल्यमापन कार्य अद्याप चालू आहे, ज्यामुळे परतीची तारीख अनिश्चित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पेसशिपमध्ये सापडलेल्या समस्येचे निराकरण करणे, ही अंतिम मुदत वाढवण्याचा उद्देश आहे. स्पेसशिपमध्ये अडचणी आल्या तरीही बोईंगचे उपाध्यक्ष मार्क नप्पी यांना या उड्डाणाबद्दल कोणतीही खंत नाही. नप्पी जोर देऊन म्हणाले की, ते नेहमीच टेस्ट फ्लाईट होते. समस्या असूनही या मिशनने मौल्यवान डेटा प्रदान केला आहे’. ते पुढे म्हणाले की, “भविष्यातील मोहिमांसाठी अंतराळ यानाला परिष्कृत आणि सुधारित करण्याच्या आमच्या प्रक्रियेचा हा भाग आहे.”

काय म्हणाले बोईंगचे उपाध्यक्ष?

बोइंगचे उपाध्यक्ष आणि कार्यक्रम व्यवस्थापक मार्क नप्पी म्हणाले की, “समस्येचे मूळ कारण शोधण्यासाठी जमिनीच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. ते पुढे म्हणाले की, जर चाचण्यांनी पूर्ण समाधान दिले तर आम्ही डॉकवरून परत येऊ शकतो. असे न झाल्यास, संपूर्ण उत्तर मिळविण्यासाठी अतिरिक्त चाचण्यांची आवश्यकता देखील असेल.” दरम्यान, विल्यम्स आणि विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर इतर अंतराळवीरांसोबत आहेत. अंतराळवीर त्यांना नेमून दिलेले काम पार पाडत आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo