ISRO ने रचला इतिहास! ‘पुष्पक’ची सलग तिसरी यशस्वी लँडिंग, जाणून घ्या RLV LEX बद्दल सविस्तर माहिती

ISRO ने रचला इतिहास! ‘पुष्पक’ची सलग तिसरी यशस्वी लँडिंग, जाणून घ्या RLV LEX बद्दल सविस्तर माहिती
HIGHLIGHTS

ISRO ने 'पुष्पक'च्या तिसऱ्या यशस्वी लँडिंगसह रचला इतिहास

'पुष्पक' नावाच्या RLV LEX-03 ने कर्नाटकातील चित्रदुर्गात यशस्वी लँडिंग केले.

हे यश विशेष आहे कारण 'पुष्पक'चा वेग कोणत्याही सामान्य विमान किंवा फायटर प्लेनपेक्षा खूपच जास्त होता.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने पुन्हा एकदा मोठे यश मिळवले आहे. होय, ISRO चे पुन्हा वापरता येण्याजोगे म्हणजेच रियुजेबल प्रक्षेपण वाहन ‘पुष्पक’चे सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग झाले आहे. याबाबत भारतीय अंतराळ एजन्सीने सांगितले की, पुष्पकच्या लँडिंगबाबतची ही अंतिम चाचणी होती, जी यशस्वी झाली आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, ‘पुष्पक’ नावाच्या RLV LEX-03 ने कर्नाटकातील चित्रदुर्गात यशस्वी लँडिंग केले आहे. ‘पुष्पक’ ने आव्हानात्मक परिस्थितीत प्रगत स्वायत्त क्षमता प्रदर्शित केली. अतिशय अचूक हॉरिझंटल लँडिंग पूर्ण केले. आम्ही तुम्हाला सांगतो की, RLV LEX 03 ची ही अंतिम चाचणी रविवारी सकाळी 7.10 वाजता झाली.

Also Read: नव्या स्टोरेज व्हेरिएंटसह Realme P1 Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व डिटेल्स

isro successfully conduct final pushpak RLV landing experiment
image cradit: PTI

सलग तिसऱ्यांदा पुष्पकची यशस्वी लँडिंग

‘पुष्पक’च्या यशस्वी लँडिंगबाबत ISRO ने सांगितले की, याआधी आमची RLV LEX-01, RLV LEX-02 मोहीमही यशस्वी झाली होती. तिसऱ्या लँडिंगच्या वेळी आव्हाने अधिक होती, वारा अधिक मजबूत होता. यासह ‘पुष्पक’ धावपट्टीपासून 4.5 किलोमीटरच्या उंचीवरून सोडण्यात आले. अखेर ‘पुष्पक’ अतिशय कौशल्याने हवेतून मार्ग काढत धावपट्टीवर उतरला. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे यश विशेष आहे कारण ‘पुष्पक’चा वेग कोणत्याही सामान्य विमान किंवा फायटर प्लेनपेक्षा खूपच जास्त होता.

लक्षात घ्या की, पुष्पक ताशी 320 किलोमीटर वेगाने उतरल्यानंतर ब्रेक पॅराशूटच्या मदतीने त्याचा वेग ताशी 100 किलोमीटरवर आणण्यात आला, असे सांगितले गेले. यानंतर त्याच्या चाकांचे ब्रेक काम करू लागले आणि ते पूर्णपणे बंद झाले. जमिनीवर फिरताना ‘पुष्पक’ने स्वतःचा तोल सांभाळला आणि सरळ धावपट्टीवर पुढे जात राहिला. यासह ही लँडिंग अगदी यशस्वीरीत्या पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या मोहिमेने अंतराळातून परतणाऱ्या वाहनासाठी दृष्टीकोन आणि लँडिंग इंटरफेस आणि हाय-स्पीड लँडिंग परिस्थितीचे अनुकरण केले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, ISRO च्या रियुजेबल लाँच व्हेईकल (RLV) च्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्वात गंभीर तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या कौशल्याची पुष्टी करण्यात आली आहे. अंतराळातून परत येणारे अंतराळयान भविष्यात कसे उतरेल हे या मोहिमेतून दिसून येते, असे इस्रोने म्हटले आहे. या यशाबद्दल इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी टीमचे अभिनंदन केले.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo