आजकाल केवळ तरुणाईच नाही तर Smartphone वापरणारे प्रत्येकच व्यक्ती रात्री झोपताना थोडं वेळ फोन बघतात. साधारणतः युजर्स रात्री झोपताना WhatsApp, सोशल मीडिया, यु-ट्यूब वर व्हीडिओ बघणे इ. कामे करत असतात. मात्र, अंधारात स्मार्टफोनचा वापर करणे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. अंधारात स्मार्टफोन बघताना त्रास होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला काही विशेष टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या डोळ्यांवर स्क्रीनचा अजिबात परिणाम होणार नाही.
Also Read: आता थेट सॅटेलाईटवरून मिळणार स्मार्टफोन्स सर्व्हिस! SpaceX ने अवकाशात सोडले 20 स्टारलिंक उपग्रह
20/20/20 नियम पाळण्याचा सल्ला डॉक्टरसुद्धा देतात. या नियमानुसार, जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल किंवा स्मार्टफोन वापरत असाल, तेव्हा दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्या आणि किमान 20 सेकंद किमान 20 फिट अंतरावर असलेल्या वस्तूकडे बघण्याचा प्रयत्न करा. हे नियम पाळल्याने डोळे सुरक्षित राहतील आणि दृष्टी देखील सुधारेल.
जास्त वेळ डोळे न मिचकावल्याने डोळ्यातील ओलावा कमी होतो. त्यामुळे एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करताना डोळ्यांना त्रास होतो. यामुळे तुमचे डोळे खराब होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी फोन वापरताना दर अर्ध्या तासाला 10 ते 20 वेळा डोळ्यांची उघडझाप करा. डोळे मिचकावल्याने डोळ्यांना पुन्हा लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
जर तुम्ही सतत स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला डोळ्यात जळजळ किंवा हलके दुखणे जाणवू लागते. यामुळे तुम्हाला सतत फोन वापरण्याची सवय सोडायची आहे तर, तुम्ही iPhones वर स्क्रीन टाइम आणि Android वर डिजिटल वेलबीइंग फीचरचा वापर करू शकता.
या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या डिव्हाइसपासून दूर राहण्याचा वेळ वाढेल. यासोबतच, चांगली झोप येण्यासाठी, ॲप लिमिट टायमर वापरा आणि ‘वाइंड डाउन’ किंवा ‘बेडटाइम’ मोड फीचर्स देखील वापरू शकता.
डार्क मोड जवळपास सर्व स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. डार्क मोड ब्लु लाईटचे प्रदर्शन कमी करण्यासाठी वापरले जाते. हा मोड ऑन केल्यास तुमच्या डोळ्यांवर स्क्रीनचा जास्त त्रास होणार नाही. यामुळे तुमचे डोळे खराब होण्याची शक्यता कमी होते.
जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन अंधारात वापरत असाल तर, तुमच्या डोळ्यांवरील स्क्रीनच्या प्रकाशाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही या टूलचा वापर करू शकता. iPhone वापरकर्ते Night Shift आणि Android युजर्स Night Light फीचर वापरू शकतात.