अंतराळवीर सुनीता विल्यम्सना पृथ्वीवर परतण्यास विलंब होणार? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण 

अंतराळवीर सुनीता विल्यम्सना पृथ्वीवर परतण्यास विलंब होणार? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण 
HIGHLIGHTS

5 जून रोजी भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात पोहोचल्या.

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांनी बोईंग स्टारलाइनर या यानातून अंतराळात उड्डाण केले.

स्टारलाइनर यान पृथ्वीवर परत येण्यास विलंब होत आहे, Nasa ने दिली माहिती

Nasa: आपणा सर्वांना माहितीच आहे की, 5 जून रोजी भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात पोहोचल्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, अंतराळवीरांची एक टीम नेहमीच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) मध्ये सज्ज असते. यासह ही टीम अंतराळात राहून अंतराळ प्रयोग पूर्ण करते. सुनीता विल्यम्ससह अंतराळवीर बुच विल्मोर यांनीही अंतराळात प्रवेश केला.

आम्ही तुम्हाला सांगतो की, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांनी बोईंग स्टारलाइनर या यानातून अंतराळात उड्डाण केले. आता अमेरिकन स्पेस एजन्सी Nasa ने म्हटले आहे की, स्टारलाइनर यान पृथ्वीवर परत येण्यास विलंब होत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात यामागील कारण-

NASA
NASA

Also Read: पृथ्वीजवळून जाणार 210 फूट विशाल लघुग्रह 2024 LJ! पृथ्वीला आहे का धोका? Nasa ने दिली माहिती

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत येण्यास विलंब का?

वर सांगितल्याप्रमाणे, 5 जून रोजी स्टारलाइनरने ISS साठी उड्डाण केले आणि दुसऱ्या दिवशी तेथे पोहोचले. जेव्हा एखादे अंतराळ यान ISS वर पोहोचते, तेव्हा ते त्याच्याशी डॉक करते आणि नंतर निर्धारित वेळेनंतर अंतराळवीरांसह पृथ्वीवर येते. अंतर, ISS वर पोहोचताना स्टारलाइनरला 4 वेळा हीलियम गळती (लीक) आणि थ्रस्टर्सच्या समस्यांचा सामना करावा लागला.

दरम्यान, बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाने अनेक उड्डाणे केली आहेत. मात्र, ते प्रथमच अंतराळवीरांसह ISS वर पोहोचले आहे. पण अगदी पहिल्या मोहिमेमध्ये अनेक तांत्रिक अडचणींचा सामान करावा लागत आहे. या अडचणींची चौकशी करणे आवश्यक आहे. या कारणास्तव सुनीता विल्यम्स आणि त्यांचे पार्टनर बुच विल्मोर यांचे पुनरागमन लांबणीवर पडले आहे.

कधीपर्यंत होणार पुनरागमन?

Nasa ने म्हटले आहे की, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा स्पेसवॉक आधीच नियोजित आहे, जो 24 जून रोजी होणार आहे. दोन्ही अंतराळवीर 26 जूनपर्यंत पृथ्वीवर परत येऊ शकतील. आता अमेरिकन स्पेस एजन्सी कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. यानातील तांत्रिक समस्यांचे निराकरण झाल्यावरच स्टारलाइनरला पृथ्वीवर परत येण्याची परवानगी मिळेल.

लक्षात घ्या की, स्टारलाइनरची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे की, भविष्यात ते 6 महिन्यांसाठी मिशन उडवू शकेल. सध्याचे मिशन कमाल 45 दिवसांसाठी डिझाइन केलेले आहे. म्हणजेच 26 जूनलाही अंतराळवीरांचे पुनरागमन शक्य झाले नाही तर NASA कडे आणखी काही दिवस असतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo