अलीकडेच लेनोवोने आपला नवीन ब्रँड जूक सादर केला होता, जो लेनोवोचा ऑनलाइन ब्रँड आहे. ह्या ब्रँडच्या अंतर्गत कंपनीने सायनोजेन मोडवर आधारित स्मार्टफोन जूक Z1 लाँच केला होता. कंपनी ह्या ब्रँडमध्ये आता नवीन स्मार्टफोन जूक Z2 लाँच करणार आहे. सध्यातरी कंपनी ह्या स्मार्टफोनवर काम करत आहे.
ह्या महिन्याच्या सुरुवातीला जूक ब्रँडचे सीईओनी असे स्पष्टीकरण दिले आहे की, जूक झेड2 स्मार्टफोन पुढील वर्षी लाँच केला जाईल. त्यांनी ह्या संदर्भात अशी माहितीही दिली होती की, हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 चिपसेटने सुसज्ज असेल.
इंटरनेटवर लीक झालेल्या फोटोंनुसार फोनचे डिझाईन पुर्णपणे आकर्षक आहे. ह्यात रोटेटिंग कॅमेरा पाहायला मिळेल, ह्या फोटोंमध्ये आपल्याला दिसेल की, हँडसेटचे डिझाईन जूक Z1पेक्षा वेगळे आहे. जूक Z2 मध्ये मेटल बॉडी डिझाईनसह एज आणि 2.5D ग्लासचा वापर केला जाईल. आणि ही ग्लास पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूस पाहायला मिळेल. हे फोटो माय ड्रायव्हर्सद्वारा दाखवली गेली आहेत.
जूक Z2 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले असू शकते, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल असेल. ह्यात 2.5GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 प्रोसेसर आणि 3GB रॅम असण्याची शक्यता आहे. हा एड्रेनो 330GPU नेसुद्धा सुसज्ज असू शकतो. लेनोवोच्या जूक Z1 हँडसेटमध्येसुद्धा USB टाइप-C ३.० पोर्ट आहे. हा स्मार्टफोन ड्युल नॅनो-सिम कार्डला सपोर्ट करते. ह्याची अंतर्गत स्टोरेज 64GB असण्याची शक्यता आहे.
हा स्मार्टफोन 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलच्या फ्रंट कॅमे-याने सुसज्ज असू शकतो.