Nubia Z18 स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 सह Geekbench वर दिसला

Nubia Z18 स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 सह Geekbench वर दिसला
HIGHLIGHTS

काही दिवसांपूर्वी कंपनी ने एका विचित्र निर्णया अंतर्गत आपल्या Nubia Z18 स्मार्टफोन वीना आपला Nubia Z18 Mini स्मार्टफोन सादर केला आहे.

Zte Nubia Z18 to launch soon with Nubia Z18s Smartphone Geekbench Listing Reveals: काही दिवसांपूर्वी कंपनी ने एका विचित्र निर्णया अंतर्गत आपल्या Nubia Z18 स्मार्टफोन वीना आपला Nubia Z18 Mini स्मार्टफोन सादर केला आहे. पण या डिवाइस च्या लॉन्च साठी अजून पर्यंत कोणतीही तारीख समोर आली नाही, तसेच कोणत्याही अधिकृत इवेंट बद्दल पण कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु Z18 स्मार्टफोन बद्दल खुप दिवसांपासून चर्चा चालू आहे. आता हा डिवाइस Geekbench वर दिसला आहे, याचा अर्थ असा की हा डिवाइस लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. 

पण बेंचमार्किंग साईट वरून मिळालेली माहिती खुप मर्यादित आहे, हा डिवाइस या लिस्टिंग मध्ये मॉडेल नंबर NX606J सह दिसला आहे, हाच काही दिवसांपूर्वी ANTUTU वर पण दिसला आहे. या नवीन लिस्टिंग मध्ये या डिवाइस ला सिंगल कोर मध्ये 2344 आणि मल्टी कोर मध्ये 8933 स्कोर मिळाला आहे. या लिस्टिंग वरून असे पण समोर येत आहे की हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आणि 6GB रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोन एंड्राइड 8.1 Oreo सह लॉन्च केला जाऊ शकतो. 

TENAA वरील स्पेक्स पाहता हा डिवाइस या लिस्टिंग मध्ये Notch डिस्प्ले सह दिसला आहे. तसेच यात तुम्हाला एक डेडिकेटेड वॉयस बटन पण मिळण्याची शक्यता आहे. असेच काहीसे आपण Z18 Mini स्मार्टफोन मध्ये बघितले आहे, पण त्यात पॉवर आणि वॉल्यूम रॉकर बटन्स दुसर्‍या बाजूला होते. 

असे पण समोर येत आहे की या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 3,350mAh क्षमता असलेली बॅटरी मिळू शकते, तसेच हा 5.99-इंचाचा एक FHD+ 2160×1080 पिक्सल च्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर यात मिळण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर यात 8GB रॅम असू शकतो. 

लिस्टिंग मध्ये फोन च्या कॅमेरा बद्दल पण माहिती समोर आली आहे, या लिस्टिंग मध्ये दिसत आहे की डिवाइस एका ड्यूल कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाऊ शकतो, या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 24-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 8-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा तुम्हाला या डिवाइस मध्ये मिळणार आहे. तसेच अजून एक 8-मेगापिक्सल चा कॅमेरा तुम्हाला यात सेल्फी इत्यादी साठी मिळू शकतो. अजून पर्यंत कंपनी ने Nubia Z18 च्या लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नाही, पण असे समोर येत आहे की हा डिवाइस यावर्षी Nubia Z18s स्मार्टफोन सोबत लॉन्च केला जाऊ शकतो. 

नोट: फीचर्ड इमेज काल्पनिक आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo