ZTE Nubia Z18 स्मार्टफोन एका मोठ्या डिस्प्ले आणि आकर्षक डिजाईन सह लॉन्च

Updated on 06-Sep-2018
HIGHLIGHTS

ZTE ने आपला बहुप्रतीक्षित डिवाइस ZTE Nubia Z18 चीन मध्ये लॉन्च केला आहे, हा कंपनीचा एक फ्लॅगशिप डिवाइस आहे, जो 91.8% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह लॉन्च करण्यात आला आहे.

ZTE ने आपला बहुप्रतीक्षित डिवाइस ZTE Nubia Z18 चीन मध्ये लॉन्च केला आहे, हा कंपनीचा एक फ्लॅगशिप डिवाइस आहे, जो 91.8% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह लॉन्च करण्यात आला आहे. या डिवाइस ची खास बाब म्हणजे याची पुढील बाजू बेजल्स वीना आली आहे, या डिवाइस मध्ये नावापुरते बेजल्स तुम्हाला दिसतील. या डिवाइस मध्ये कंपनी ने नुसार 91.8% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात नॉच च्या नावाखाली एक कटआउट आहे. जी सेल्फी कॅमेरा साठी यात देण्यात आली आहे. 

ZTE Nubia Z18 स्पेसिफिकेशन्स
फोन मध्ये एक 5.99-इंचाचा 1080×2160 पिक्सल चा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो टॉप आणि बॉटमला फक्त नाममात्र बेजल्स सह येतो. याव्यतिरिक्त तुम्हाला याच्या साईडला बेजल्स दिसणारच नाहीत. याचा अर्थ असा की तुम्हाला या डिवाइस मध्ये एक मोठी स्क्रीन मिळणार आहे, त्याचबरोबर एक खूपच छोटी नॉच असल्यामुळे ही अजूनच आकर्षक आणि मोठी वाटेल.  

ZTE Nubia Z18 मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट मिळत आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला 6GB आणि 8GB चा रॅम सह 64GB आणि 128GB ची नॉन एक्सपेंडेबल स्टोरेज मिळत आहे. फोन मध्ये एक 3450mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी क्वालकॉम च्या क्विक चार्ज 4.0 टेक्नोलॉजी सह Neo Power Temperature Control सह येते. 

ZTE Nubia Z18 कॅमेरा 
फोन मधील कॅमेरा पाहता एक 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो तुम्हाला पोर्ट्रेट सेल्फी शॉट देऊ शकतो. तसेच यात तुम्हाला एक ड्यूल रियर कॅमेरा मिळत आहे, जो 16-मेगापिक्सल आणि 24-मेगापिक्सलचा कॅमेरा कॉम्बो आहे. या कॅमेर्‍यात पण तुम्हाला पोर्ट्रेट मोड, एडवांस्ड सीन रिकग्निशन आणि 960fps स्लो-मोशन विडियो रिकॉर्डिंग फीचर मिळत आहे. 

ZTE Nubia Z18 किंमत आणि उपलब्धता
ZTE Nubia Z18 स्मार्टफोन तुम्ही चीन मध्ये प्री-आर्डर करू शकता. या डिवाइसच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 2,799 आणि 8GB व 128GB स्टोरेज वेरिएंट CNY 3,299 मध्ये विकत घेता येईल. Nubia Z18 स्मार्टफोन तुम्ही ब्लॅक किंवा रेड रंगात घेऊ शकता. तसेच याचा एक स्पेशल एडिशन Van Gogh Edition पण सादर करण्यात आला आहे, जो CNY 3,599 मध्ये विकत घेता येईल. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :