मोबाईल निर्माता कंपनी ZTE ५ जानेवारीला आपला नवीन स्मार्टफोन नूबिया Z11 सादर करेल. तसे मागील काही दिवसांपासून ह्या स्मार्टफोनविषयी बरीच माहिती समोर आली आहे.
ह्या स्मार्टफोनच्या लाँचच्या तारखेविषयी गिजमोचाइना वेबसाइटने माहिती दिली आहे. गिजमोचाइना अनुसार, हा स्मार्टफोन ५ जानेवारीला लाँच होऊ शकतो. त्याचबरोबर ZTE ने आपली आंतरराष्ट्रीय वेबसाइटवर संकेत दिले आहे. ज्यात ‘हॅलो वर्ल्ड’ असे लिहून ५ जानेवारी तारीख दिली आहे.
ह्या स्मार्टफोनविषयी ह्याआधी मिळालेल्या माहितीनुसार, ZTE नूबिया Z11 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 820 चिपसेटवर सादर केला जाऊ शकतो. फोनरेडारवर दिलेल्या माहितीत कंपनी नूबिया Z11 मध्ये नवीन बेजल लेस डिस्प्ले तंत्रज्ञानाचा उपयोग करु शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, ह्या स्मार्टफोनची डिस्प्ले सॅमसंगचे वक्र कडा डिस्प्लेसारखी आहे. ज्यात पुर्ण बॉडीशिवाय वक्रमध्ये टॉपवर ग्लास लेयरचा उपयोग होईल. तर वक्र डिस्प्लेवर जेस्चर सपोर्ट शॉर्टकटची सुविधा उपलब्ध होईल. त्याचबरोबर अशी माहिती दिली गेली आहे की, ह्या स्मार्टफोनमध्ये ६४ बिट्स स्नॅपड्रॅगन ८२० क्वाडकोर प्रोसेसर असण्याची शक्यता आहे आणि हा नवीन चिपसेटवर आधारित डिवाइस २०१६ च्या सुरुवातीला उपलब्ध होईल.
हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असू शकते. ह्यात फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा असू शकतो. फोनमध्ये ड्यूल टोन LED फ्लॅशसह २०.७ मेगापिक्सेल रियर कॅमेरा असू शकतो. तेथे सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असण्याचीही शक्यता वर्तविण्यात येतेय.