ZTE नूबिया Z11 लाँच, 6GB रॅमने सुसज्ज
ह्यात 4GB रॅम आणि 64GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच दुस-या प्रकारात 6GB रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी ZTE ने बाजाराता आपला नवीन फोन नूबिया Z11 लाँच केला आहे. सध्यातरी कंपनीने ह्या फोनला चीनमध्ये लाँच केले आहे. एप्रिल महिन्यात कंपनीने बाजारात नूबिया Z11 मिनी स्मार्टफोन लाँच केला होता आणि ह्याआधी कंपनीने नूबिया Z11 मॅक्स लाँच केला होता.
ZTE नूबिया Z11 स्मार्टफोनला मेटल बॉडीसह लाँच केले गेले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅनग 820 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 4GB रॅम आणि 64GB चे अंतर्गत स्टोरेजसह येतो. तसेच दुस-या प्रकारात 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे आणि मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ह्या स्टोरेजला वाढवूही शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या फोनमध्ये ५.५ इंचाची डिस्प्ले आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1080p आहे. हा गोरिला ग्लास 3 सह येतो. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. ह्यात एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे. ह्याच्या 4GB व्हर्जनची किंमत CNY 2,499 ($375) आहे. तर 6GB रॅम व्हर्जनची किंमत CNY 3,499 ($526) आहे.
हेदेखील वाचा – उत्कृष्ट मेटल बॉडीसह येणारे हे आकर्षक स्मार्टफोन्स आता भारतातही झाले उपलब्ध…
नूबिया Z11 मिनी स्मार्टफोन लाँच केला होता. ह्या स्मार्टफोनमध्ये मेटल फ्रेम सुद्धा आहे. ह्यात 2.5D ग्लाससुद्धा दिली आहे. हा स्नॅपड्रॅगन 617 चिपसेटने सुसज्ज आहे. ह्यात 3GB ची रॅम देण्यात आली आहे. हा फोन 64GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो आणि ह्यात मागील बाजूस फिंगरप्रिंट रीडरसुद्धा दिला गेला आहे. हा एक ड्यूल-सिम फोन आहे आणि ह्यात VoLTE सपोर्टसुद्धा आहे. फोनमध्ये 2800mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – LYF अर्थ 2 स्मार्टफोन लाँच, किंमत २०,९९९ रुपये
हेदेखील वाचा – मोटो Z, मोटो Z फोर्स स्मार्टफोन्स सप्टेंबरमध्ये होणार भारतात लाँच?