ZTE ने आपल्या स्मार्टफोनची Prague सीरिजला आपल्यात सामील केले आहे आणि ह्याच्या अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन Nubia Prague S स्मार्टफोनसुद्धा लाँच केला आहे. हा स्मार्टफोन आता चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे आणि ह्याची किंमत CNY २,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन शनिवारपासून मिळणे सुरु होईल.
Nubia Prague S स्मार्टफोन एक ड्यूल-सिम सपोर्ट करणारा फोन आहे. जो अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपसह नूबिया UI 3.0 वर काम करतो. ह्यात 5.2 इंचाची FHD 1080X1920 पिक्सेलची सुपर AMOLED OGS 2.5 डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याला गोरिला ग्लास 3 ने संरक्षित केले गेले आहे. स्मार्टफोनमध्ये 64 बिट ऑक्टा-कोर क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसर दिला गेला आहे आणि ह्यात एड्रेनो 405 GPU सह 3GB ची LPDDR3 रॅम दिली गेली आहे.
ह्या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, फोटोग्राफीसाठी ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा फेज डिटेक्शन ऑटोफोकस (PADF), f/2.2 अॅपर्चर, 5P लेन्स आणि LED फ्लॅशसह दिला गेला आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. येथेसुद्धा आपल्याला f/2.4 अॅपर्चर आणि वाइड अँगल लेन्ससह मिळत आहे. दोन्ही कॅमे-यामध्ये कंपनीचा नेटिव निओ विजन 5.2 कॅमेरा UI दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये आपल्याला 64GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
Nubia Prague S स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी पर्यायाबाबत बोलायचे झाले तर, ह्यात 4G LTE, ब्लूटुथ, वायफाय, GPS आणि मायक्रो-USB पर्याय दिले गेले आहे. स्मार्टफोनमध्ये 2200mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. जी कंपनीनुसार १० मिनिटांच्या त्वरित चार्जिंगच्या माध्यमातून ०-२५ टक्के चार्ज होते.