ZTE बाजारात अॅनड्रॉईड लॉलीपॉपने सुसज्ज असलेले मिड-रेंज स्मार्टफोन्स आणले आहेत. ZTE ब्लेड X9, X5 आणि ब्लेड X3 असे हे स्मार्टफोन आहेत. यातील पहिला स्मार्टफोन ब्लेड X9ची किंमत RUB १७,९९९ (जवळपास १८,४०० रुपये) आणि RUB ८,९९०(जवळपास ९,२०० रुपये) इतरी आहे. ह्या स्मार्टफोनला चीनच्या बाहेर कधी लाँच केले जाईल याविषयी सध्यातरी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा एक ड्युल सिम सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे. आपल्याला ह्यात 4G सपोर्ट मिळत आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची ड्युल HD 1080×1920 पिक्सेल रिझोल्युशन डिस्प्ले मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये आपल्याला 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसरसह 2GB रॅम मिळत आहे.
ह्या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 13MP चा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. तसेच 16GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे. ज्याला आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. स्मार्टफोनमध्ये आपल्याला 3000mAh क्षमता असलेली मोठी बॅटरीसुद्धा मिळत आहे.
त्याचबरोबर जर ZTE ब्लेड X5 स्मार्टफोनविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD 720×1280 पिक्सेल रिझोल्युशनची IPS डिस्प्ले मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6735 प्रोसेसरसह 1GB ची रॅम मिळत आहे. फोनमध्ये 2400mAhक्षमतेची बॅटरीसुद्धा दिली गेली आहे. अंतर्गत स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर, स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे. ज्याला आपण 32GB पर्यंत वाढवू शकतो. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह 13MPचा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे.
त्याशिवाय जर ZTE चा तिसरा आणि सर्वात स्वस्त असा स्मार्टफोन ZTE ब्लेड X3 विषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये X5 सारखीच सर्व वैशिष्ट्य आहेत. मात्र काही फरक आहे, तो कॅमेरा रिझोल्युशन, CPU आणि बॅटरीमध्ये आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर ह्यात 4000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.