ZTE Blade V40 Pro Smartphone मेक्सिको मध्ये लाँच झाला आहे. स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. ZTE Blade V40 Pro स्मार्टफोन 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,100mAh बॅटरीने समर्थित आहे. कंपनीचा दावा आहे की, नवीन लॉन्च केलेला स्मार्टफोन अवघ्या 15 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकतो. ZTE ने MWC 2022 मध्ये ZTE Blade V40 सिरीजच्या इतर मॉडेल्ससह Blade V40 Pro स्मार्टफोन सादर केला.
हे सुद्धा वाचा : AIRTEL कडून ग्राहकांना गिफ्ट ! आता 'या' प्लॅनमध्ये मिळेल आधीपेक्षा जास्त वैधता आणि डेटा, पूर्वीप्रमाणेच किंमत
ZTE Blade V40 Pro 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत मेक्सिकोमध्ये MXN 7,499 म्हणजेच 29,000 रुपये आहे. हा फोन डार्क ग्रीन आणि Iridescent White कलर ऑप्शन्सबद्दल खरेदी केला जाऊ शकतो.
ZTE Blade V40 Pro मध्ये 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. त्यामध्ये सेंट्रली सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल दिला गेला आहे. हा फोन Android 11 वर काम करेल. प्रोसेसर म्हणून त्यात ऑक्टा कोर Unisoc T618 SoC देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे.
याव्यतिरिक्त, ZTE Blade V40 Pro मध्ये 64-मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, 5-मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. त्याच वेळी, या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये AI-असिस्टेड फेशियल ब्युटी फिल्टरसह 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
ZTE Blade V40 Pro 5,100mAh बॅटरी आहे, जी 65W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. फोनची लांबी 163.9 मिमी, रुंदी 76.2 मिमी आणि जाडी 8.3 मिमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ZTE ने मार्चमध्ये MWC 2022 मध्ये Blade V40 सिरीज स्मार्टफोन लाँच केले होते. या सिरीजमध्ये ZTE ब्लेड V40 5G, ZTE ब्लेड V40, ZTE ब्लेड V40 Pro आणि ZTE ब्लेड V40 Vita यांचा समावेश आहे.