हा स्मार्टफोन 1.5GHz क्वाड-कोर क्वालकॉम MSM8939 स्नॅपड्रॅगन 615 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी ZTE ने आपला नवीन स्मार्टफोन ब्लेड S7 लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन ब्लेड S6 चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. ह्या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे, ह्यात १३ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाही.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ZTE ब्लेड S7 स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 441ppi आहे. हा स्मार्टफोन 1.5GHz क्वाड-कोर क्वालकॉम MSM8939 स्नॅपड्रॅगन 615 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि १३ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. कॅमेरा अॅपमध्ये फेस डिटेक्शन, एचडीआर, पनोरमा आणि जियो टॅगिंग फीचर आहे. फ्रंट कॅमेरा फ्लॅश आणि फेज डिटेक्शन ऑटोफोकससह दिला गेला आहे. ह्यात 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
हा स्मार्टफोन एक ड्युल सिम ड्युल स्टँडबाय डिवाइस आहे. हा अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. स्मार्टफोनमध्ये 4G, 3G, वायफाय 802.11 A/B/G/N/AC, ब्लूटुथ, मायक्रो-USB, GPS/A-GPS आणि 3.5mm ऑडियो जॅक कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.