ZTE ब्ले़ड D लक्स स्मार्टफोन लाँच

ZTE ब्ले़ड D लक्स स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात ग्राफिक्ससाठी एड्रेनो 306 GPU इंटिग्रेटेड आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.

मोबाईल निर्माता कंपनी ZTE ने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन ब्लेड D मॅक्स सादर केला. सध्यातरी हा स्मार्टफोन व्हिएतनाम आणि सिंगापूरमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने ह्याची किंमत VND 3,890,000 (जवळपास ११,६०० रुपये) ठेवली आहे.

ZTE ब्लेड D लक्स स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेवर 2.5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे संरक्षण दिले आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात ग्राफिक्ससाठी एड्रेनो 306 GPU इंटिग्रेटेड आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.

ZTE ब्लेड D लक्स स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करतो आणि हा ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ, GPS आणि मायक्रो-USB फीचर्स आहेत. ह्यात 3000mAhची बॅटरी दिली गेली आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo