मोबाईल निर्माता कंपनीने ZTE ने भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन ZTE ब्लेड A910 आणि ब्लेड V7 मॅक्स लाँच केले. कंपनीने भारतात ह्या स्मार्टफोन्सची किंमत १३,३०० रुपये आणि १८,४०० रुपये ठेवली आहे.
ZTE ब्लेड V7 मॅक्स ड्यूल-सिम स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो (MiFavor UI स्किनसह)
ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ही डिस्प्ले 2.5D कर्व्ह्ड ग्लासने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 1.GHZ ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे आणि 3GB आणि 4GB रॅमचा पर्याय मिळेल. ह्या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे, जो फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि LED फ्लॅशने सुसज्ज आहे. ह्यात ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ,GPS आणि USB टाइप-C सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिले गेले आहे.
हेदेखील पाहा – 2.5D कर्व्ह्ड डिस्प्लेसह येतात भारतातील हे आकर्षक स्मार्टफोन्स
तर ZTE ब्लेड A910 ड्यूल सिमविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम (MiFavor UI v3.5 सह) वर चालतो. ह्यात 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6735 प्रोसेसर दिला गेला आहे. हा 2GB आणि 3GB रॅमच्या पर्यायात उपलब्ध होईल. ह्यात माली- T720 GPU सुद्धा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 16GB आणि 32GB अंतर्गत स्टोरेज पर्यायासह येईल. ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 2540mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – हुआवे P9 Lite स्मार्टफोन लाँच, १३ मेगापिक्सेलच्या आकर्षक कॅमे-याने सुसज्ज
हेदेखील वाचा – Le Max, Le Max आणि वनप्लस 2 मध्ये कोणता फोन आहेत सर्वात उत्कृष्ट