ZTE ने सादर केला नवीन किफायतीशीर स्मार्टफोन ZTE BLADE A5 2019
डिवाइस मध्ये देण्यात आला आहे 13 मेगापिक्सलचा कॅमेरा
ZTE ने आपला नवीन एंट्री-लेवल स्मार्टफोन ZTE Blade A5 2019 लॉन्च केला आहे. Blade A5 2019 एक किफायतीशीर स्मार्टफोन आहे जे पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणार आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. ZTE Blade A5 2019 फक्त रशियात उपलब्ध आहे.
ZTE Blade A5 2019 ची डिजाइन जवळपास Rs 7000 मध्ये येणाऱ्या इत्तर स्मार्टफोन्स सारखी आहे. डिवाइसचा आस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे. ZTE Blade A5 2019 मध्ये 5.45 इंचाचा IPS LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याला टेम्पर्ड ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे आणि हा Unisoc SC9863A क्वॉड-कोर चिपसेट वर चालतो. स्मार्टफोन मध्ये 2 GB रॅम आणि 16 GB स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रो एसडी कार्डने वाढवता येते.
ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर स्मार्टफोनच्या मागे 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे ज्याचा अपर्चर f/2.0 आहे तसेच डिवाइसच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचा अपर्चर f/2.4 आहे. स्मार्टफोन मध्ये कनेक्टिविटी साठी ब्लूटूथ, Wi-Fi, प्राइमरी सिम कार्ड मध्ये 4G LTE आणि VoLTE सपोर्ट आहे.
स्मार्टफोन मध्ये 2600mAh ची लिओन बॅटरी देण्यात आली आहे आणि हा स्मार्टफोन एंड्राइड 9 पाई MiFavor 9.0 UI वर चालतो.
ZTE Blade A5 2019 ची किंमत RUB 6,490 (जवळपास Rs 7,000) मध्ये सेल केला जात आहे. डिवाइस ब्लू आणि ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.