मोबाईल निर्माता कंपनी ZTE ने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Axon MAx सादर केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला चीनमध्ये सादर केले गेले आहे. मात्र आता लवकरच ह्याला अनेक देशांत सादर केले जाईल. ह्या स्मार्टफोनची किंमत CNY 2799 (जवळपास २८,६०० रुपये) आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 6 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617 प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
ह्यात १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि १३ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 4140mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा हँडसेट क्विक चार्ज 2.0 सपोर्ट करतो, ज्याने अर्ध्या तासात फोनला ० ते ६० टक्क्यांपर्यंत चार्ज करतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये वायफाय, GPS, ब्लूटुथ, USB टाइप-C आणि OTG पोर्ट आहे. ZTE चा हा हँडसेट ड्यूल सिम (नॅनो+नॅनो) सपोर्ट करतो. हा अॅनड्रॉईडच्या 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.