अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोने सुसज्ज असलेला ZTE Axon 7 स्मार्टफोन लाँच

अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोने सुसज्ज असलेला ZTE Axon 7 स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

ह्यात क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 820 64- बिट प्रोसेसर देण्यात आला आहे. हा एड्रेनो 530GPU सह येतो. ह्यात 4GB आणि 6GB चे रॅम असे दोन पर्याय मिळतात.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी ZTE ने बाजारात आपला नवीन फोन Axon 7 लाँच केला. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला युरोपच्या पाच देशांमध्ये लाँच केले गेले आहे. ZTE Axon 7 स्मार्टफोनचे 4GB व्हर्जन अॅमेझॉन इंडियावर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. ह्या स्मार्टफोनला मागील महिन्यात चीनमध्ये लाँच केले आहे. चीनमध्ये ह्याचे तीन व्हर्जन लाँच केले गेले आहे. 4GB रॅम व्हर्जन 64GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. 6GB व्हर्जन 128GB स्टोरेजसह येतो.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनचे रिझोल्युशन 2560×1440 पिक्सेल आहे. ह्यात 2.5D ग्लाससुद्धा आहे. ही डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 ने सुसज्ज आहे. ह्यात क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 820 64 बिट प्रोसेसर आहे. हा एड्रेनो 530 GPU सह येतो. ह्यात 4GB आणि 6GB चे रॅम असे दोन पर्याय मिळतात. हा 64GB/128GB अंतर्गत स्टोरेज पर्यायासह येतो. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. ह्यात 3250mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा क्विक चार्ज 3.0 सपोर्टसह लाँच केला गेला आहे.

हेदेखील वाचा – उत्कृष्ट मेटल बॉडीसह येणारे हे आकर्षक स्मार्टफोन्स आता भारतातही झाले उपलब्ध…

ह्या स्मार्टफोनमध्ये 20 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे, जो ड्यूल LED फ्लॅशसह येतो. ह्यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. हा 4G LTE, वायफाय, NFC, फिंगरप्रिंट सेंसर, USB टाइप – C पोर्ट, ब्लूटुथ आणि GPS सारख्या फीचर्ससह येतो. ह्याचा आकार 151.7×75×7.9mm आणि वजन १८५ ग्रॅम आहे.

 

हेदेखील वाचा – आता लकी ड्रॉ ठरविणार कोणाला मिळणार फ्रीडम 251 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – HP ने लाँच केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त लॅपटॉप क्रोमबुक 11G5

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo