ZTE Axon 7 मिनी स्मार्टफोन लाँच, स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर ने सुसज्ज

Updated on 30-Aug-2016
HIGHLIGHTS

ZTE Axon 7 मिनी स्मार्टफोन Axon 7 आधीचा वेरियंट असू शकतो.

ZTE Axon 7 मिनी स्मार्टफोन सर्वात आधी जुलैमध्ये समोर आला होता आणि आता ह्याला जर्मनीमध्ये लाँच केले गेले आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत २९९ यूरो आहे आणि आपण ह्याला जवळपास ९,४८४ रुपयात खरेदी करु शकता. ह्याला आपण सिल्वर आणि गोल्ड रंगात खरेदी करु शकता. त्याशिवाय ZTE Axon 7 मिनी स्मार्टफोन Axon 7 आधीचा वेरियंट असू शकतो.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची FHD 1920x1080p IPS डिस्प्ले मिळत आहे. ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसरसुद्धा दिले गेले आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. त्याशिवाय ह्याच्या मागील बाजूस आपल्याला एक फिंगरप्रिंट सेंसर मिळत आहे.

 

हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालतो. त्याचबरोबर ह्यात एक 2705mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळत आहे. त्याशिवाय ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 13MP चा ऑटोफोकस रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि 8MP च्या फ्रंट फेसिंग कॅमे-यासह मिळत आहे. हा एक ड्यूल सिम सपोर्ट करणारा डिवाइस आहे आणि ह्यात 4G सपोर्टसुद्धा मिळत आहे.

हेदेखील वाचा – रिलायन्स Jio प्रीव्ह्यू ऑफर आता सॅमसंग, LG 4G स्मार्टफोन्ससाठीही झाली उपलब्ध
हेदेखील वाचा – मुंबईच्या ७ रेल्वे स्टेशन्सवर सुरु झाली मोफत वायफाय सेवा

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :