जोपोने आपला नवीन स्मार्टफोन स्पीड 8 लाँच केला. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडिलवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्याची किंमत २९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ह्या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा फोन हेलिओ X20 डेका-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 4GB ची रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज सुद्धा दिले आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली आहे, ज्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1080 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1080 पिक्सेल आहे. ह्यात अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टम दिला आहे. हा 3600mAh बॅटरीने सुसज्ज आहे. हा जलद गतीन चार्जिंग करण्याच्या सपोर्टसह येतो.
हेदेखील पाहा – [Marathi] Coolpad Max Unboxing – कूलपॅड मॅक्स अनबॉक्सिंग
जोपो स्पीड 8 मध्ये 21MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह येतो. फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा LED फ्लॅशसह येतो. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.
हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स
ह्यात 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ, GPS, NFC, USB टाइप- C पोर्ट आणि फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा दिले आहेत. ह्याचा आकार 152.2×76.35×9.8mm आणि वजन १३६ ग्रॅम आहे.
हेदेखील वाचा – एअरटेल, आयडिया, वोडाफोनने लागू केले GSMA मोबाईल कनेक्ट सोल्युशन
हेदेखील वाचा – नोकियाच्या स्मार्टफोन्समध्ये असणार 2K डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर?