मोबाईल निर्माता कंपनी झोपोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन स्पीड 7 प्लस लाँच केला आहे. हा स्मार्टफोन झोपो स्पीड 7 ची नवीनतम आवृत्ती आहे. ह्याची किंमत १४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे आणि हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर खरेदी करु शकता. हा २५ ऑक्टोबरपासून भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध केला जाईल.
झोपोच्या स्पीड 7 प्लस स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर ह्यात ५.५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन ६४ बिट मीडियाटेक प्रोसेसर आणि ३ जीबी रॅमने सुसज्ज आहे. हा एक ड्युल सिम 4G LTE स्मार्टफोन आहे. हा अॅनड्रॉईड ५.१ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. तसेच ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-SDकार्डच्या माध्यमातून ६४जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या रियर कॅमे-याने १०८०पिक्सेल व्हिडियो रेकॉर्डिंग रिझोल्युशन मिळतो. हा स्मार्टफोन २१ ऑक्टोबरपासून ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे असताना २५ ऑक्टोबरपासून हा ऑनलाईन खरेदी केला जाऊ शकतो.
कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतामध्ये ह्याच स्मार्टफोनच्या झोपो स्पीड 7 प्लस चा जुना व्हर्जन झोपो स्पीड 7 लाँच केला होता. ह्या स्मार्टफोनला १२,९९९ किंमतीत लाँच केले होते.
झोपो स्पीड 7 (ZP951) अॅनड्रॉईडची नवीनतम आवृत्ती ५.१ लॉलीपॉपवर आधारित आहे, आणि त्यासोबत ह्यात ६४ बिट मीडियाटेक ६७५३ ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची IPS डिस्प्ले पुर्ण एचडी रिझोल्युशन सह दिली गेली आहे. त्याचबरोबर ३जीबी रॅमसुद्धा आपल्याला दिली जाणार आहे. फोनमध्ये १६ जीबीचे अंतर्गत स्टोरेज आधीपासूनच समाविष्ट आहे आणि जर आपण ह्याला वाढवू इच्छिता तर आपण निर्धास्त होऊन वाढवू शकता. आपण ह्याला ६४ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये १३.२ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे.