मोबाईल निर्माता कंपनी झोलोने आपला स्मार्टफोन ब्लॅकला 3GB रॅम प्रकारात लाँच केले आहे. कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये ठेवली आहे. झोलो ब्लॅकचा 3GB रॅम असलेला स्मार्टफोन एक्सक्लुसिव्ह ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडीलवर उपलब्ध होईल आणि ह्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. स्मार्टफोनला 29 डिसेंबरला फ्लॅश मॉडलच्या माध्यमातून विकले जाईल.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले 1080 पिक्सेल रिझोल्युशनसह दिली आहे. आणि पिक्सेल तीव्रतेबाबत बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन 401ppi ने सुसज्ज आहे. ह्याची डिस्प्ले गोरिल्ला ग्लासने संरक्षित आहे. हा स्मार्टफोन ६४ बिट स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 3GB रॅम येतो. ह्यात एड्रेनो 405 GPU सुद्धा आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्यूल कॅमेरा सेंसर आहे. ह्यात १३+२ मेगापिक्सेलचा ड्यूल कॅमेरा दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.० लॉलीपॉपवर चालतो. ह्याची जाडी ७.३एमएम आहे.
ह्याच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, ह्यात ड्यूल सिमसह LTE सपोर्ट, वायफाय आणि ब्लूटुथ सपोर्टसुद्धा आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 3200mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.