हा ड्यूल सिम स्मार्टफोन आहे, ज्यात 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 5 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे.
Ziox ने बाजारात आपला नवीन फोन Zi5003 लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात ह्या डिवाइसची किंमत ४,९९० रुपये ठेवली आहे. हा फोन स्लॅट ब्लॅक, रोझ गोल्ड आणि रिच ब्लू रंगात विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्याचबरोबर हा १ वर्षाच्या वॉरंटीसह मिळत आहे.
हा ड्यूल सिम स्मार्टफोन आहे, ह्यात 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 5 इंचाची FWVGA डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 854×480 पिक्सेल आहे. हा डिवाइस 512MB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 4GB चे अंतर्गत स्टोरेज सुद्धा दिले आहे. ह्या स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. हा फोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
हा स्मार्टफोन ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्यात 2000mAh ची बॅटरी दिली आहे. ह्या फोनमध्ये जेस्चर कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहे. ह्यात 21 भारतीया भाषांना सपोर्टसुद्धा मिळतो. हा वायफाय, ब्लूटुथ, GPRS आणि A-PS सारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्सने सुसज्ज आहे.