मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सच्या यू टेलिवेंचर्स ब्रँडने आपला सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा फोन लाँच करुन काहीच दिवस झाले आहेत. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत २४,९९९ रुपये ठेवली आहे. हा एक वर्षाच्या मॅन्युफॅक्चरर वॉरंटीसह येईल आणि ह्याच्या बॉक्समध्ये असलेल्या अॅक्सेसरीजवर आणि बॅटरीवर ६ महिन्याची वॉरंटी मिळेल. आता ह्या स्मार्टफोनला आपण अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातूनसुद्धा घेऊ शकता.
त्याचबरोबर यू ने एक नवीन सेवा सुरु केली आहे. ह्या सेवेचे नाव ‘अराउंड यू’ असे ठेवण्यात आले आहे. ह्या अॅपच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. जर यू यूटोपिया स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.2 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2560×1440 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 564ppi आहे आणि हा 16M रंगांच्या सपोर्टसह येतो. हा स्मार्टफोन 2Ghz A57 क्वाडकोर 1.5GHz A53 क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे, जो की LED फ्लॅशसह येतो. ह्यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 (Cyanogen OS 12.1) ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्यात 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.