मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सची सहाय्यक कंपनी यू लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन यूफोरिया एक नवीन प्रकारात लाँच करण्याची शक्यता आहे. खरे पाहता, जीएफएक्स बेंचमार्क डेटाबेस साइटवर यू यूफोरिया (यू६०००) बद्दल माहिती दिली आहे. नवीन यूफोरियाचा नंबर यू6000 असेल,तर जुन्या युफोरियाचा नंबर यू५०१० आहे. सध्यातरी कंपनीद्वारा नवीन यूफोरियाबद्ल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
सध्यातरी ह्याच्या बेंचमार्कवर लिस्ट झालेल्या माहितीनुसार यू यूफोरिया ह्या नवीन स्मार्टफोनमध्ये ४.६ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले असू शकते, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल असू शकते. अशी आशा आहे की,. हा स्मार्टफोन 1.5GHz मिडियाटेक MT6753 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज असू शकतो.ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज असण्याचा दावा केला गेला आहे.
प्राप्त केलेल्या माहितीनुसार, ह्या स्मार्टफोनच्या नवीन आवृत्तीमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असू शकतो.
मायक्रोमॅक्सने ह्याच वर्षी मे मध्ये आपला यूफोरिया स्मार्टफोन लाँच केला होता, ज्याची किंमत ६,९९९ रुपये इतकी होती.
उपलब्ध असलेल्या यू यूफोरियाच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन १२८०x७२० पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१० चिपसेट, 1.2GHz कोर्टेक्स A53 क्वाडकोर प्रोसेसर आणि २जीबी रॅमने सुसज्ज आहे.