यू यूनिकॉर्न स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, किंमत १२,९९९ रुपये
ह्या स्मार्टफोनमध्ये 4GB ची रॅम देण्यात पहिल्या महिन्यानंतर हा स्मार्टफोन १४,९९९ रुपयास विकला जाईल.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला Yu चा नवीन स्मार्टफोन यूनिकॉर्न आज अखेर भारतात लाँच आहे. मायक्रोमॅक्सच्या Yu टेलिवेंचर्सचा हा नवीन स्मार्टफोन आतापर्यंतचा सर्वात आकर्षक स्मार्टफोन असल्याचे सांगितले जातय. ह्याची किंमत १२,९९९ रुपये असून हा फ्लिपकार्टवर वर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ह्याचा पहिला फ्लॅश सेल ७ जूनला होणार असून त्यासाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. मात्र ह्या स्मार्टफोनची ही किंमत कायम राहणार नसून एक महिन्यानंतर ह्याची किंमत १४,९९९ रुपये होईल. ह्या फोनमध्ये अॅल्युमिनियम बॅक दिली गेली आहे. हे स्मार्टफोन दोन रंगात मिळतील, रश सिल्वर आणि ग्रेफाइट. त्याचबरोबर काही दिवसानंतर हा रश गोल्ड रंगात सुद्धा मिळेल.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. हा डिवाइस 1.8GHz मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसरसह 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे आणि हे आपण 128GB पर्यंत वाढवू शकतो. फोन 4000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.
हेदेखील वाचा – .. तर असा होता परमाणु हत्यारांचा इतिहास आणि कार्य
हा फोन अॅनड्रॉईड ऑन स्टेरॉयड्स (AOS) वर काम करतो. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर आधारित आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्या फोनमध्ये मार्शमॅलोचे अपडेटसुद्धा खूपच लवकर मिळेल. ह्या फोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा आहे. ह्यात DTS ऑडियोचा सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे.
कंपनीने अॅनड्रॉईड यू 2.0 ला सुद्धा लाँच करेल, ज्याच्या माध्यमातून यूजर्स अनेक सेवा वापरु शकतात जशा की, कॅब्स, डॉक्टर्स, फूड वगैरे. जर यूजर्सने कॅब्स सर्विसेस निवडले तर त्याला उबर, ओला सारख्या सेवा मिळतील.
हेदेखील वाचा – आसूसच्या नवीन झेनफोन 3 मध्ये आहे 6GB ची रॅम, किंमत २४९ डॉलरपासून सुरु
हेदेखील वाचा – आता व्हॉट्सअॅपवरुनही ट्रान्सफर करता येणार पैसे…!!