Yu चा नवीन स्मार्टफोन यूनिकॉर्न आज लाँच होणार आहे. मायक्रोमॅक्सच्या Yu टेलिवेंचर्सचा हा नवीन स्मार्टफोन आतापर्यंतचा सर्वात आकर्षक स्मार्टफोन असल्याचे सांगितले जातय. जो कोणत्याही मोठ्या फ्लॅगशिप स्मार्टफोनला टक्कर देईल. त्याशिवाय कंपनीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची नवीन परिभाषा लिहेल.
ह्याच्या लाँचला लांबणीवर टाकण्याचे कारण निवडणूक आणि त्याची मतमोजणी असल्याचे सांगितले जातय. ह्यासाठी हा स्मार्टफोन आता ३१ मे ला लाँच केला जाईल, हे निश्चित करण्यात आले आहे.
गीकबेंच लिस्टिंगनुसार, हा डिवाइस 1.8GHz मिडियाटेक हेलिओ P10 ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज असेल. त्याशिवाय ह्यात 4GB चे रॅम असेल. डिवाइश YU5530 ला बेंचमार्क टेस्टमध्ये सिंगल कोर टेस्टमध्ये 816 आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 3059 स्कोर मिळाले आहेत. त्याशिवाय आम्ही ह्या डिवाइसला ह्याच फीचर्ससह GFX बेंचमध्ये पाहिले होते. GFX बेंच अनुसार हा स्मार्टफोन 1920x1080p रिझोल्यूशन सह 5.4 इंचाची डिस्प्लेमध्ये येईल, ज्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज पर्याय असतील.
हेदेखील पाहा – कसा आहे मोटो G4 प्लस स्मार्टफोन, जाणून घ्या ह्या चित्रांच्या माध्यमातून..
GFX बेंचमध्ये १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा असण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे, ज्यात 4 हजारांपेक्षा जास्त व्हिडियो रेकॉर्ड केले जातील. त्याचबरोबर ह्यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असेल.
यू टेलिवेंचर्सने अलीकडेच यू यूरेका नोट लाँच केला होता. ज्यात 1920x1080p रिझोल्युशनची ६ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले आहे. ह्यात 16GB स्टोरेज आणि 4000mAh ची बॅटरी दिली आहे.
हेदेखील पाहा- झोलो ब्लॅक 1X च्या किंमतीत झाली घट, ही आहे ह्याची नवीन किंमत
हेेदेखील पाहा- लवकरच आपल्याला मिळणार “मेड इन इंडिया” आयफोन्स?