यू यूनिकॉर्नची पुढील फ्लॅश सेल होणार १४ जूनला
यू यूनिकॉर्न स्मार्टफोनची किंमत १२,९९९ रुपये आहे आणि हा ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
मायक्रोमॅक्सचे सब-ब्रँड यू ने भारतात 31 मे ला आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन यूनिकॉर्न लाँच केला. ह्या फोनला १२,९९९ रुपयात लाँच केले गेले. मात्र ही किंमत केवल १ महिन्यासाठीच आहे. लाँचच्या एक महिन्यानंतर ह्याची किंमत १३,४९९ रुपये होईल. ७ जूनला ह्या स्मार्टफोनच्या फ्लॅशसेलचे आयोजन कऱण्यात आले होते. दुपारी २ वाजता हा फ्लिपकार्टवर हा फ्लॅश सेल झाला. त्यानंतर काही वेळातच ह्या स्मार्टफोनचे सर्व यूनिट्स विकले गेले. तथापि अजूनपर्यंत कंपनीने ह्या स्मार्टफोन्सच्या यूनिट्स नेमका आकडा सांगितलेला नाही. मात्र कंपनीनो अशी माहिती दिली आहे, की ह्याचा पुढील फ्लॅशसेल १४ जूनला होणार आहे. ह्या सेलचे ७ जूनपासूनच रजिस्ट्रेशन सुरु झाले आहेत. हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर १२,९९९ रुपयाच्या किंमतीत उपलब्ध आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. हा डिवाइस 1.8GHz मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसरसह 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे आणि हे आपण 128GB पर्यंत वाढवू शकतो. फोन 4000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.
हेदेखील पाहा – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू
हा फोन अॅनड्रॉईड ऑन स्टेरॉयड्स (AOS) वर काम करतो. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर आधारित आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्या फोनमध्ये मार्शमॅलोचे अपडेटसुद्धा खूपच लवकर मिळेल. ह्या फोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा आहे. ह्यात DTS ऑडियोचा सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे.
हेदेखील वाचा – ऑनर 4X स्मार्टफोनला भारतात अॅनड्रॉईड मार्शमॅलो अपडेट मिळणे सुरु
हेदेखील वाचा – यू यूनिकॉर्न विरुद्ध मोटो G4 प्लसमध्ये कोण आहे सरस?