यू यूनिकॉर्न आज होणार विक्रीसाठी उपलब्ध
यू यूनिकॉर्नची आज पहिली फ्लॅश सेल होणार आहे. दुपारी २ वाजता हा फ्लिपकार्टवर हा फ्लॅश सेल सुरु होईल.
मायक्रोमॅक्सचे सब-ब्रँड यू ने भारतात 31 मे ला आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन यूनिकॉर्न लाँच केला. ह्या फोनला १२,९९९ रुपयात लाँच केले गेले. मात्र ही किंमत केवल १ महिन्यासाठीच आहे. लाँचच्या एक महिन्यानंतर ह्याची किंमत १३,४९९ रुपये होईल. आज पहिल्यांदा हा स्मार्टफोनचा फ्लॅशसेल होणार आहे. दुपारी २ वाजता हा फ्लिपकार्टवर हा फ्लॅश सेल सुरु होईल. त्यानंतर काही वेळातच हा स्मार्टफोन ऑफलाइन स्टोर्सवरसुद्धा उपलब्ध होईल.
त्यामुळे जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु इच्छिता, तर तुम्ही आज दुपारी १ पर्यंत ह्याचे रजिस्ट्रेशन करु शकता. त्याचबरोबर आपण ह्या फोनला SBI कार्डच्या माध्यमातून खरेदी करु शकता, ज्यात आपल्याला 10% कॅशबॅक मिळेल.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. हा डिवाइस 1.8GHz मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसरसह 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे आणि हे आपण 128GB पर्यंत वाढवू शकतो. फोन 4000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.
हेदेखील पाहा – …तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन
हा फोन अॅनड्रॉईड ऑन स्टेरॉयड्स (AOS) वर काम करतो. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर आधारित आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्या फोनमध्ये मार्शमॅलोचे अपडेटसुद्धा खूपच लवकर मिळेल. ह्या फोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा आहे. ह्यात DTS ऑडियोचा सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे.
कंपनीने अॅनड्रॉईड यू 2.0 ला सुद्धा लाँच करेल, ज्याच्या माध्यमातून यूजर्स अनेक सेवा वापरु शकतात जशा की, कॅब्स, डॉक्टर्स, फूड वगैरे. जर यूजर्सने कॅब्स सर्विसेस निवडले तर त्याला उबर, ओला सारख्या सेवा मिळतील.
हेदेखील वाचा – महिंद्रा eVerito इलेक्ट्रिक कार भारतात लाँच, किंमत ९.५० लाखांपासून सुरु
हेदेखील वाचा – planar magnetic टेक्नॉलॉजीसह येणारा जगातील पहिला हेडफोन लाँच