Yu ने आपल्या प्रोडक्ट लिस्टला वाढवून आपला एक नवीन डिवाइस यूरेका नोट फॅबलेट लाँच केला आहे. कंपनीद्वारा ह्या डिवाइसची किंमत १३,४९९ रुपये ठरविण्यात आली आहे.
यू ने आपला एक नवीन डिवाइस यूरेका नोट फॅबलेट लाँच केला आहे. कंपनीद्वारा ह्या डिवाइसची किंमत १३,४९९ रुपये ठरविण्यात आली आहे. हा सर्व मोबाइल स्टोर्सवर मिळणे सुरु झाले आहे. हा तुम्ही तुमच्या जवळच्या मोबाईल स्टोरमधून खरेदी करु शकता.
ह्या फॅबलेटच्या इतर स्पेसिफिकेशन्सविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 6 इंचाची FHD डिस्प्ले 1920×1280 पिक्सेलसह मिळत आहे. त्याशिवाय ही स्क्रीन आपल्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह मिळत आहे. ह्यात 1.5GHz चा मिडियाटेक प्रोसेसर आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 3GB चे रॅम मिळत आहे. ह्याच्या स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर, ह्यात आपल्याला 16GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
त्याशिवाय यूरेका नोट फॅबलेटमध्ये आपल्याला अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ओएस मिळत आहे. हा डिवाइस 4000mAh क्षमतेची आकर्षक बॅटरी देतो. जर ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 13MP चा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा मिळत आहे.