Xiaomi युजर्सची मज्जाच मजा! तीन महिने फ्री मध्ये बघा प्रीमियम सर्व्हिसचे ऑनलाइन व्हिडिओ

Xiaomi युजर्सची मज्जाच मजा! तीन महिने फ्री मध्ये बघा प्रीमियम सर्व्हिसचे ऑनलाइन व्हिडिओ
HIGHLIGHTS

Xiaomiची YouTube सह भागीदारी

वापरकर्त्यांना 3 महिन्यांसाठी YouTube Premium चे मोफत सबस्क्रिप्शन

YouTube Music Premiumचा लाभदेखील उपलब्ध

Xiaomi आपल्या वापरकर्त्यांना उत्तम फ्री बेनिफिट ऑफर करत आहे. कंपनीने अलीकडेच यूट्यूबसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीचा थेट फायदा Xiaomi स्मार्टफोन आणि टॅब वापरणाऱ्या वापरकर्त्यांना होणार आहे. कंपनीने सांगितले की, या भागीदारी अंतर्गत, पात्र वापरकर्त्यांना निवडक Xiaomi उपकरणांवर तीन महिन्यांपर्यंत विनामूल्य YouTube प्रीमियम सदस्यता मिळेल. कंपनीची ही ऑफर 6 जूनपासून सुरू झाली असून यूजर्स 31 जानेवारी 2023 पर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

हे सुद्धा वाचा: 50 तासांच्या बॅटरी लाइफसह Mivi Earbuds लाँच, 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

या उपकरणांवर YouTube प्रीमियम विनामूल्य

Xiaomi डिव्हाइसेस ज्यावर तीन महिन्यांची YouTube Premium मोफत ट्रायल दिली जात आहे, त्यात Xiaomi 12 Pro, Xiaomi 11i, Xiaomi 11i हायपरचार्ज आणि Xiaomi 11T Pro यांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे, कंपनी Redmi उपकरणांवर 2 महिन्यांची YouTube Premium मोफत ट्रायल देत ​​आहे. यामध्ये Redmi Note 11 Pro +, Redmi Note 11 Pro, Redmi Note 11, Redmi Note 11T आणि Redmi Note 11S यांचा समावेश आहे. तुम्ही Xiaomi Pad 5 खरेदी केल्यास, तुम्हाला 2 महिन्यांसाठी YouTube Premium ची मोफत ट्रायल मिळेल.

YouTube Music Premiumचा लाभदेखील उपलब्ध 

YouTube Premium हे जगभरातील व्हिडिओ पाहण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या व्यासपीठाची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथे व्हीडिओ जाहिरात सामग्रीशिवाय पाहता येतात. सामान्य YouTube मध्ये, आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला आणि मध्यभागी अनेक जाहिराती पहाव्या लागतात, ज्यामुळे कधीकधी खूप चिडचिड तयार होते. YouTube Premium मध्ये YouTube Music Premium देखील समाविष्ट आहे, जेथे वापरकर्ते 80 दशलक्षाहून अधिक गाणी, लाइव्ह परफॉर्मन्स आणि जाहिरातीशिवाय रीमिक्स ऐकू शकतात.

1 फेब्रुवारी 2022नंतर खरेदी केलेल्या डिव्हाइससाठी ऑफर

महत्त्वाचे म्हणजे कंपनीची ही ऑफर केवळ त्या उपकरणांसाठी आहे, जे 1 फेब्रुवारी 2022 रोजी किंवा त्यानंतर ऍक्टिव्ह झाले आहेत. YouTube Premium ची फ्री ट्रायल सुरू करण्यासाठी, तुमच्या खरेदी केलेल्या पात्र फोनवर YouTube ऍप उघडा. यानंतर स्क्रीनवर नमूद केलेले स्टेप्स फॉलो करा आणि ही ऑफर रिडीम करा. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo