झोलोने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन झोलो एरा एचडी लाँच केला आहे, हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपसह ५ इंचाच्या डिस्प्लेने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ४,७७७ रुपये आहे.
झोलोने आपला नवीन स्मार्टफोन झोलो एरा एचडीला भारतात लाँच केले आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉपसह बाजारात आणला जाईल. आणि ह्याची किंमत ४,७७७ रुपये आहे. गॅजेट360 वर ह्या बातमीला प्रकाशित केले गेले आहे. हा त्याच माध्यमातून उपलब्धसुद्धा आहे.
हा स्मार्टफोन कंपनीच्या एरा प्रकारातील स्मार्टफोन आहे. आणि कंपनीने ह्याला ह्याच वर्षी जुलैमध्ये लाँच केला होता. ह्या स्मार्टफोनचे सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे ह्या स्मार्टफोनला 720×1280 पिक्सेलचा IPS डिस्प्ले आहे. ज्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. त्याचबरोबर हा एक ड्युल सिम सपोर्ट करणारा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो.
जसे की आपण झोलो एरामध्ये पाहिले, तसेच झोलो एरा HD मध्ये ८ मेगापिक्सेलचा ऑटोफोकससह रियर कॅमेरा जो LED फ्लॅशने सुसज्ज आहे आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. स्मार्टफोन क्वाड-कोर स्प्रेडट्रम SC7713G प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो 1.2GHz स्पीड देतो. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1GB रॅम आणि mali 400 MP GPU दिला गेला आहे.
स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवता येऊ शकते. स्मार्टफोमध्ये 2500mAh क्षमता असलेली मोठी बॅटरी दिली गेली आहे, जी कंपनी अनुसार १० तासांपर्यंतचा टॉकटाईम देते. आणि 3G नेटवर्कवर 556 तासांचा स्टँडबाय वेळ देते. ह्या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी पर्यायामध्ये GPRS/EDGE, 3G, वायफाय 802.11 b/g/n आहे आणि त्याचबरोबर ह्यात हॉटस्पॉट फंक्शनलिटीसुद्धा दिली गेली आहे. ह्यात FM रेडियो, मायक्रोयुएसबी आणि GPS सुद्धा आहे.