XOLO Era 4G: ४,७७७ रुपयाच्या किंमतीत येणारा झोलोचा स्वस्त 4G स्मार्टफोन
झोलोचा हा 4G स्मार्टफोन इतर स्वस्त 4G स्मार्टफोनला कडक टक्कर देईल. ह्याची किंमत ४,७७७ रुपये आहे.
झोलोने आपला Era 4K स्मार्टफोन लाँच केल्यानंतर लगेचच आपला नवीन स्मार्टफोन झोलो Era 4G लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ४,७७७ रुपये आहे आणि ह्याला स्नॅपडिलच्या माध्यमातून एक्सक्लुसिव्हली खरेदी करु शकता. ह्या स्मार्टफोनसाठी पहिली फ्लॅश सेल २६ फेब्रुवारीला होईल. तसेच आजपासून ह्या स्मार्टफोनचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
कंपनीने सांगितले आहे की, त्यांनी आपल्या Era रेंज स्मार्टफोन्सचे जवळपास १,५०,००० युनिट्स स्नॅपडिलच्या माध्यमातून विकले आहेत. 4G सपोर्टसह ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा अनेक भारतीय भाषांना सपोर्ट करतो, ज्यात आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिसा, पंजाबी, तमिळ आणि तेलगु यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. आणि असे सांगितले जातय की, ह्या स्मार्टफोनला लवकरच अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोने अपडेट केले जाईल.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4G सपोर्टसह 5 इंचाची IPS HD डिस्प्ले 720×1280 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. स्मार्टफोनच्या डिस्प्लेला गोरिला ग्लासने संरक्षित केले गेले आहे. स्मार्टफोनमध्ये 1.5Ghz क्वाड-कोर प्रोसेसर दिले गेले आहे. त्याचबरोबर ह्यात 1GB चे रॅम दिले गेले आहे. स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनआधी कंपनीने Era 4K लाँच केला होता, ज्याची किंमत ६,४९९ रुपये आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची HD 720×1280 पिक्सेलची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्याला गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षण दिले गेले आहे. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे.
हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. तसेच ह्यात आपल्याला ड्यूल सिम सपोर्टसुद्धा मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 64 बिटचे 1Ghz क्वाड-कोर प्रोसेसर 2GB ची DDR3 च्या रॅमसह मिळत आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
तसेच ह्यात 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा 5P Largan lens आणि ड्यूल LED फ्लॅशसह मिळत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.
हे पाहा – ३५,००० हजाराच्या किंमतीत येणारे आणि उत्कृष्ट कॅमेरा सेंसर असलेले सर्वोत्कृष्ट कॅमेरे
हेदेखील वाचा – शिवछत्रपतींच्या 'डुडल'साठी ऑनलाइन मोहीम जोरदार सुरु
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile