झोलोने मंगळवारी आपला स्मार्टफोन झोलो ब्लॅक 1X च्या किंमतीत १००० रुपयांची घट केली आहे. लाँचवेळी ह्या स्मार्टफोनची किंमत ९,९९९ रुपये होते आणि आता हा ७,९९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे.
झोलोने आपला ब्लॅक 1X स्मार्टफोनची किंमत कमी करुन एका नव्या किंमतीत भारतात लाँच केला आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ह्या फोनला ९,९९९ रुपयात बाजारात आणले होते. त्यानंतर ह्या वर्षी जानेवारीमध्ये ह्याची किंमत कमी करुन ८,९९९ रुपये केली होती. आणि आता ह्या स्मार्टफोनची किंमत ७,९९९ रुपये केली आहे. झोलो ब्लॅक 1X कंपनीचा असा दुसरा हँडसेट आहे, ज्याला काळ्या रंगात लाँच केले गेले आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ह्यात 1.3GHz 64 बिट मिडियाटेक MT6753 ऑक्टा-कोर प्रोसेसर, 450MHz माली-T720 GPU आणि 3GB रॅम दिली गेली आहे. हा 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
त्याशिवाय ह्यात LED फ्लॅशसह 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि 2400mAh ची बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्यात ड्यूल सिम सपोर्ट आणि 4G इंडियन LTE बँड्स, 3G HSPA+, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटुथ 4.0 आणि इतर अनेक कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहे.