मोबाईल निर्माता कंपनी शाओमी आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 2 प्राईम लवकरच लाँच करु शकतो. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर लिस्ट केले गेले आहे. ह्याच्या लिस्टिंगसह ह्या स्मार्टफोनशी संबंधित सर्व माहिती ह्या वेबसाइटवर दाखवली गेली आहे. अॅमेझॉन इंडियावर हॅश टॅगसह प्राइम इज कमिंग असे लिहून ह्याबाबत माहिती दिली गेली आहे, आणि आशा आहे की. शाओमी रेडमी नोट 2 प्राईम भारतात लाँच होऊ शकतो.
तसेच शाओमीने आपल्या एक ट्विटमधून ह्यात एक ट्विस्ट निर्माण केला आहे. कंपनीने ट्विटरच्या अकाऊंटवर येणा-या नवीन फोन्सची माहिती दिली आहे. ह्या मोबाईन निर्माता कंपनीने आपल्या ट्विटर अकाउंटमध्ये हॅश टॅगसह प्राइम इज कमिंग लिहून फोनचा काही तपशील सांगितला आहे. त्याचबरोबर कंपनीने अशीही माहिती दिली आहे की, शाओमीचा नवीन प्राईम फोन १५ डिसेंबरला लाँच केला जाईल.
शाओमीद्वारा दिल्या गेलेल्या माहितीनुसार, ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची IPS डिस्प्ले असेल, ज्याचे रिझोल्युशन 1280×720 पिक्सेल असेल. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम सपोर्टसुद्धा असेल आणि हे दोन्हीही सिम 4Gला सपोर्ट करतात.