शाओमीची ‘पिक मी’ सेवा आता संपुर्ण भारतात उपलब्ध

शाओमीची ‘पिक मी’ सेवा आता संपुर्ण भारतात उपलब्ध
HIGHLIGHTS

ही सेवा सर्वात आधी दिल्ली आण एनसीआऱ क्षेत्रात सुरु झाली होती, मात्र आता 6076 पेत्रा जास्त पिन कोड, ५९७ शहर आणि २९ राज्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मोबाईल निर्माता कंपनी शाओमीची ‘पिक मी सेवा आता संपूर्ण भारतात उपलब्ध झाली आहे. शाओमीने आपल्या ह्या सेवेला अलीकडेच सादर केले होते. सुरुवातीला त्यांनी दिल्ली आणि एनसीआरमध्ये ही सादर केली होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शाओमी “पिक मी” सेवा आता भारतातील प्रत्येक राज्यात उपलब्ध झाली आहे. ही सेवा सर्वात आधी दिल्ली आण एनसीआऱ क्षेत्रात सुरु झाली होती, मात्र आता 6076 पेक्षा जास्त पिन कोड, ५९७ शहर आणि २९ राज्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ही सेवा कोहिमा, भुज, कांगडा आणि अंदमान आणि निकोबार आइसलँडमध्येसुद्धा उपलब्ध होईल.

जर आपण शाओमीच्या ह्या सेवेचा लाभ घेऊ इच्छिता तर आपल्याला केवळ 7676404444 ह्या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आपली समस्येची नोंद करावी लागेल. त्याचबरोबर ग्राहक टोल फ्री नंबर 18001036286 वर कॉल करुनसुद्धा आपली समस्या सांगू शकता.

शाओमी पिक मी सर्विस पिकअप, रिपेयरिंग आणि डिलिव्हरीमध्ये एकूण २४ तासांची वेळ आहे. याचा अर्थ ग्राहकाला २४ तासांत आपला फोन परत मिळेल. परंतू २४ तासांची ही सुविधा केवळ मेट्रो सिटी; दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि बंगलूरुमध्ये उपलब्ध आहे. भारतातील अन्य शहरांमध्ये ह्या सेवेसाठी ७ ते १० दिवस लागू शकतात. त्याचबरोबर ग्राहकाला SMS आणि ईमेलच्या माध्यमातून सर्विस स्टेटसचा अपडेट प्राप्त होत राहिल.

शाओमी ‘पिक मी’ सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या घरीच फोन रिपेयरसाठी पिकअप आणि ड्रॉप ऑफची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. पिक मी सेवेचे फी १८९ रुपये आङे, ज्याचे रक्कम ऑनलाइन किंवा कॅश ऑन डिलिव्हरीद्वारा केली जाऊ शकते.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo