शाओमीच्या स्मार्टफोन्सवर मिळत आहे उत्कृष्ट डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर्स

Updated on 22-Dec-2015
HIGHLIGHTS

एक्सचेंज ऑफर काही निवडक हँडसेट्सवरच मिळत आहे. त्याशिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारा डिस्काउंट आपल्या फोनची स्थिती आणि त्याच्या एजवरसुद्धा अवलंबून असेल.

मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या स्मार्टफोन्सवर उत्कृष्ट डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर्सची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ह्या आफर्स २१ ते २३ डिसेंबरपर्यंतच असेल. ह्याविषयी कंपनीने स्वत: ट्विटरवर माहिती दिली आहे.

 

एक्सचेंज ऑफर काही निवडक हँडसेट्सवरच मिळत आहे. त्याशिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारा डिस्काउंट आपल्या फोनची स्थिती आणि त्याच्या एजवरसुद्धा अवलंबून असेल.

हा डिस्काउंट ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर मिळत आहे. ह्या डिस्काउंटसह फ्लिपकार्ट स्टँडर्ड चार्टर्ड आणि सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरसुद्धा 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देत आहे. त्याशिवाय EMI सुविधासुद्धा देत आहे.

फ्लिपकार्ट Mi 4 वर ६००० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरसुद्धा देत आहे. अशीच ऑफर Mi 4i च्या 16GB च्या प्रकारातसुद्धा दिली गेली आहे.

शाओमीची ख्रिसमस सेल अंतर्गत Mi 4 च्या 16GB मूळ किंमत १४,९९९ रुपये आहे, मात्र ह्या सेलमध्ये आपण हा १२,९९९ रुपयात खरेदी करु शकता. तर ज्याची मूळ किंमत ११,९९९ रुपये आहे अशा Mi 4i च्या 16GB च्या प्रकारातील स्मार्टफोनला आपण ९,९९९ रुपयात खरेदी करु शकता. तर Mi Pad ज्याची किंमत १२,९९९ रुपये आहे तो ९,९९९ रुपयात मिळत आहे.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :