लीक आला समोर; Xiaomi एका फोल्डेबल फोन वर करत आहे काम

Updated on 07-Jan-2019
HIGHLIGHTS

इंटरनेट वर लीक झालेल्या एका हॅन्ड्स-ऑन विडियो मधून समोर आले आहे कि Xiaomi आपल्या पहिल्या फोल्डेबल फोन वर काम करत आहे, पण अजूनतरी याबद्दल अधिकृतरित्या काहीच समोर आलेले नाही.

काही दिवसांपूर्वी Xiaomi ने घोषणा केली आहे कि Redmi एक वेगळा ब्रँड झाला आहे. आता असे होईल कि Redmi एक बजेट सेंट्रिक ब्रँड म्हणून समोर येईल जसा आता आहे. आणि जर Mi फोन्स बद्दल बोलायचे तर ते अजून प्रीमियम बनवले जाऊ शकतात, जसे चालू आहे. याव्यतिरिक्त बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी डिवाइस बद्दल बोलायचे झाले तर आपल्याकडे एक अजून ब्रँड पण POCO म्हणून, या ब्रँड अंतर्गत POCO F1 मोबाइल फोन असा एकमात्र फोन आहे, जो Rs 20,000 च्या आत तुम्हाला स्नॅपड्रॅगॉन 845 सह मिळतो.

2018 Xiaomi साठी खूप चांगला गेला आहे पण कंपनी 2019 मध्ये यापेक्षा जास्त चांगले करू इच्छिते. यावर्षी कंपनी ने अनेक Redmi Phones सोबत अनेक Mi Phones आणि POCO Phone पण लॉन्च केला आहे. आपण यावर्षी जे बघितले आहे येत्या वर्षात पण असे काहीसे दिसेल. याव्यतिरिक्त असे पण समोर येत आहे कि कंपनी एक फोल्डेबल फोन पण लॉन्च करू शकते, या फोन वर कंपनी काम पण करत आहे.

नुकतीच सॅमसंग ने हि घोषणा केली आहे, आणि सांगितले आहे कि ते लवकरच आपला फोल्डेबल फोन लॉन्च करणार आहे. हा फोन कंपनी ने एक प्रोटोटाइप म्हणून दाखवला देखील. हा फोन Galaxy X म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. पण अजून सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन कधी लॉन्च केलं जाईल याची माहिती मिळालेली नाही.

पण याबद्दल येणारी माहिती पाहता असे वाटत आहे कि लवकरच हा फोन सत्यात येणार आहे. पण आता सॅमसंग नंतर Xiaomi पण चर्चेत आहे ते आपला फोल्डेबल फोन लवकरच लॉन्च करू शकतात, यावर कंपनी पण काम करत आहे. या Xiaomi च्या फोल्डेबल फोन बद्दल एक हॅन्ड्स-ऑन विडियो पण इंटरनेट वर दिसला आहे.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :