Xiaomi च्या ‘या’ टॉप 5 स्मार्टफोन्सच्या किमतीत मोठी कपात, बघा नवी किंमत
फ्लॅगशिप Xiaomi 12 Pro देखील यादीत समाविष्ट आहे.
Xiaomi 11 Lite NE 23,999 रुपयांना उपलब्ध आहे.
तुम्ही Xiaomi 11i हायपरचार्ज 24,999 रुपयांना खरेदी करू शकता.
Xiaomi ने आपला Xiaomi 13 Pro स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये लाँच केला होता. नवीन फोन लॉन्च केल्यानंतर आता Xiaomi ने आपल्या काही स्मार्टफोन्सच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन Xiaomi फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, ही यादी तुमच्या कामाची आहे…
हे सुद्धा वाचा : BSNL चा जबरदस्त प्लॅन ! दररोज 3GB डेटा आणि 455 दिवस अमर्यादित कॉलिंग
1. XIAOMI 12 PRO
Xiaomi 12 Pro 62,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता आणि आता तो 10,000 रुपये स्वस्त मिळत आहे. म्हणजेच तुम्ही Xiaomi 12 Pro 52,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता.
2. XIAOMI 11 LITE NE
Xiaomi 11 Lite NE 26,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता आणि आता 23,999 रुपयांना उपलब्ध आहे. Xiaomi 11 Lite NE ला 1080 x 2400 पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह 6.55-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळत आहे.
3. XIAOMI 11I HYPERCHARGE
Xiaomi 11i हायपरचार्ज पूर्वी 1,000 रुपयांच्या कपातीनंतर 25,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला होता आणि आता डिव्हाइसचा बेस व्हेरिएंट 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Xiaomi 11i हायपरचार्जमध्ये 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेला 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.
4. XIAOMI K50I
Xiaomi K50i स्मार्टफोन 2000 रुपयांच्या कपातीनंतर 23,999 रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे. Redmi K50i MediaTek Dimensity 8100 SoC द्वारे समर्थित आहे आणि 6GB आणि 8GB RAM सह येतो. हा फोन Android 12 वर आधारित MIUI 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
5. REDMI 11 PRIME 5G
Redmi 11 Prime 5G ची किंमत 14,999 रुपये होती पण आता 1000 रुपयांनी कपात केल्यानंतर ते 13,999 रुपयांना विकले जात आहे. Redmi 11 Prime 5G मध्ये 1080 x 2408 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.58-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. डिस्प्लेला 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile