Xiaomi ने भारतात 7 जूनला होणार्या आपल्या एका इवेंट साठी मीडिया इन्वाइट पाठवने सुरू केले आहे. ही तारीख कंपनी च्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स वर भरपूर लीक इत्यादि नंतर दिसली आहे. असे बोलले जात आहे की या इवेंट मध्ये कंपनी तिचा Redmi S2 डिवाइस लॉन्च करू शकते.
या मीडिया इनवाइट वरून जास्त काही समोर येत नाही आहे पण यात इवेंट ची तारीख आणि वेळ तसेच जागा दिसत आहे. पण फोन बद्दल या इनवाइट मध्ये जास्त माहिती मिळत नाही. परंतू या इनवाइट मध्ये स्मार्टफोन च्या कॅमेरा चा एक फोटो आहे जो पाहून कळते की हा डिवाइस AI सह लॉन्च केला जाऊ शकतो. हा डिवाइस चीन मध्ये याआधी या महिन्याचा सुरवातीला लॉन्च करण्यात आला आहे. तिथे यात AI आधारित सेल्फी कॅमेरा आहे, जी याची मोठी खासियत आहे.
पण असे बोलले जात आहे की हा डिवाइस भारतात Redmi Y2 नावाने लॉन्च केला जाईल, Xiaomi ने आपल्या Y सीरीज मध्ये आपला Y1 डिवाइस भारतात मागच्या वर्षी लॉन्च केला होता. हा अफोर्डेबल श्रेणी मध्ये लॉन्च केला गेलेला चांगला सेल्फी फोन आहे.
याच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा डिवाइस कंपनी चा दुसरा 18:9 डिस्प्ले वाला स्मार्टफोन आहे ज्याचे रेजोल्यूशन 720 x 1440 पिक्सल आहे. डिस्प्ले ची साइज Mi 6X आणि Redmi Note 5 Pro प्रमाणे 5.99 इंच आहे. तसेच या डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट आहे आणि 4GB रॅम तसेच 64GB इंटरनल स्टोरेज सह येतो. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज विकल्पां मध्ये उपलब्ध आहे, याच्या एका वेरिएंट मध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज तर दुसर्या वेरिएंट मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. माइक्रो एस डी कार्ड ने स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते.
डिवाइस मध्ये एक फिंगरप्रिंट स्कॅनर आहे तसेच डिवाइस फेस अनलॉक फीचर सह पण येतो जो सध्या स्मार्टफोन्स मध्ये एक ठरलेला फीचर आहे. डिवाइस एंड्राइड 8.1 ओरियो वर आधारित MIUI 9.5 वर चालतो आणि डिवाइस मध्ये 3080mAh ची बॅटरी आहे. कनेक्टिविटी साठी फोन 4G LTE, VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 4.2 आणि GPS ऑफर करतो. या स्मार्टफोन चे मेजरमेंट 160.73 × 77.26 × 8.1mm आणि वजन 170 ग्राम आहे. डिवाइस मध्ये इन्फ्रारेड सेंसर पण आहे ज्यातून यूजर्स आपल्या घरातील TV आणि AC कण्ट्रोल करू शकतात.
ऑप्टिक्स पाहता डिवाइस च्या बॅक वर 12MP आणि 5MP चा कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, सेकेंडरी कॅमेरा डेप्थ सेंसर आहे. रियर कॅमेरा इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन (EIS) आणि पोर्ट्रेट मोड ला सपोर्ट करतो. डिवाइस च्या फ्रंट ला 16MP चा सेल्फी शूटर आहे आणि Redmi S2 ला कंपनी चा बेस्ट सेल्फी स्मार्टफोन बोलले जात आहे.