Xiaomi Mi 8 डिवाइस सह लॉन्च केला जाऊ शकतो Xiaomi Mi Note 5 डिवाइस, या मोठया खासियत सह केला जाईल सादर

Xiaomi Mi 8 डिवाइस सह लॉन्च केला जाऊ शकतो Xiaomi Mi Note 5 डिवाइस, या मोठया खासियत सह केला जाईल सादर
HIGHLIGHTS

Xiaomi चीन मध्ये 31 मे ला आपल्या एका इवेंट चे आयोजन करत आहे, ज्या मधून ते आपल्या 8वा वाढदिवस स्पेशल Xiaomi Mi 8 स्मार्टफोन लॉन्च करू शकतात.

Xiaomi 31 मे ला चीन मध्ये आपल्या एका इवेंट चे आयोजन करत आहे आणि या इवेंट मध्ये कंपनी कडून अशी बातमी देण्यात आली आहे की ते आपला Mi 8 एनिवर्सरी एडिशन लॉन्च करणार आहेत. तसेच काही रुमर्स पाहता असे पण समोर आले आहे की कंपनी आपल्या या इवेंट मधुन काही इतर डिवाइस पण लॉन्च करू शकते. 
असे समोर आले आहे की या इवेंट मध्ये कंपनी त्यांचा Mi Max 3 डिवाइस लॉन्च करू शकते, त्याचबरोबर असेही होऊ शकते की या इवेंट मध्ये खुप काळा पासून चर्चेत असलेला स्मार्टफोन Xiaomi Mi Note 5 पण लॉन्च केला जाईल. हा डिवाइस काही दिवसांपूर्वी चीनी सोशल मीडिया वर दिसला आहे. या डिवाइस बद्दल असे बोलले जात आहे की Mi 8 सह चीन मध्ये हा पण लॉन्च केला जाऊ शकतो.  
जर हा डिवाइस लॉन्च झाला तर कंपनी च्या मोठ्या स्मार्टफोन श्रेणी मध्ये अजून एक नोट डिवाइस सामील होईल. Xiaomi Mi Note 5 स्मार्टफोन Mi Note 3 च्या पीढीतिल नवीन स्मार्टफोन च्या रुपात लॉन्च केला जाऊ शकतो, हा मिड-रेंज मधील स्मार्टफोन आहे. असे समोर येत आहे की Xiaomi Mi 7 डिवाइस कंपनी कडून स्किप केला जात आहे. त्यामुळे कंपनीने आपला Note 4 डिवाइस स्किप केल्यास आश्चर्य वाटू नये. 
त्याचबरोबर असेही समजत आहे की 4 नंबर ला चीन मध्ये अशुभ मानले जाते. हे पण एक मोठे कारण असू शकते ज्यामुळे Xiaomi सरळ आपला Mi Note 5 डिवाइस लॉन्च करेल. 
Xiaomi Mi Note 5 डिवाइस बद्दल काही माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार डिवाइस 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो, हा एक फुल स्क्रीन 2.0 डिजाईन सह येईल. फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट मिळेल, तसेच यात 6GB च्या रॅम सह 64GB ची इंटरनल स्टोरेज असू शकते. 
फोन 43LTE बँड्स सह लॉन्च केला जाऊ शकतो, तसेच यात 4-एक्सिस ऑप्टिकल स्टेबिलाइजेशन पण आहे. याच्या कॅमेरा बद्दल काहीच माहिती समोर आली नाही. या डिवाइस च्या किंमती बद्दल बोलायचे तर याच्या लॉन्च पर्यंत काहीच बोलता येणार नाही पण असा अंदाज लावला जात आहे की हा RMB 2299 म्हणजे जवळपास Rs 24,183 च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo