सध्या Xiaomi भारतातील सरावात मोठी स्मार्टफोन कंपनी आहे असे आपण म्हणू शकतो. IDC च्या एका रिपोर्ट नुसार कंपनी एंट्री-लेवल आणि मिड-रेंज मध्ये येणाऱ्या सेगमेंट मध्ये जास्त प्रभावीपणे काम करत आहे. पण प्रीमियम सेगमेंट मध्ये अजूनतरी या कंपनी ची पकड OnePlus, Samsung आणि Apple सारखी नाही. परंतु आता असे वाटते आहे कि या श्रेणीत पण कंपनी लवकरच आपली पकड बनवू शकते.
आज कंपनी भारतात प्रीमियम सेगमेंट मध्ये आपल्या सब-ब्रँड अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन POCO F1 लॉन्च करणार आहे. असे बोलले जात आहे कि या श्रेणीत कंपनी तुम्हाला प्रीमियम हार्डवेयर आणि जबरदस्त स्पेक्स देणार आहे. या स्मार्टफोन लॉन्च सोबतच कंपनी OnePlus आणि Asus Zenfone 5Z ला चांगलीच टक्कर देऊ शकते. तसेच POCO F1 नंतर कंपनी कडून त्यांचा Xiaomi Mi 8 स्मार्टफोन पण भारतीयबाजारात लॉन्च केला जाऊ शकतो, हा डिवाइस सप्टेंबर मध्ये लॉन्च केला जाणार असल्याचे समोर येत आहे.
हा डिवाइस काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. चीन मध्ये यात एक 6.21-इंचाचा 1080×2248 पिक्सल वाला 18:9 आस्पेक्ट रेश्यो असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात सॅमसंग ने बनवलेला सुपर AMOLED डिस्प्ले आहे. तसेच या डिस्प्ले मध्ये नॉच डिजाईन पण आहे.
कॅमेरा बद्दल बोलायचे तर हा डिवाइस एका 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सह लॉन्च करण्यात आला आहे. जो नॉच मध्ये आहे त्या सोबत तिथे प्रोक्सिमिटी सेंसर, इयरपिस, इन्फ्रारेड लाइटिंग आणि इन्फ्रारेड लेंस पण आहे. फोन मध्ये कंपनी ने एक एडवांस इन्फ्रारेड फेस अनलॉक फीचर दिला आहे. असे बोलले जात आहे की हा अॅप्पल च्या iPhone X मधील फेस ID पेक्षा पण जास्त सिक्योर आहे.
हा डिवाइस क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच हा डिवाइस या प्रोसेसर सोबत AnTuTu वर बघितल्यास याला सर्वात जास्त म्हणजे 301,472 चा स्कोर मिळाला आहे. यापेक्षा जास्त स्कोर या प्रोसेसर सोबत इतर कोणत्याही स्मार्टफोनला मिळालेला नाही. या डिवाइस च्या रियर कॅमेरा बद्दल बोलायचे तर या डिवाइस मध्ये 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा देण्यात आले आहेत. फोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो.