अस वाटत आहे की शाओमी या वर्षी भारतात कमीत कमी 6 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. लाइवमिंट शी एका इंटरव्यू दरम्यान शाओमी ग्लोबल VP आणि इंडिया हेड, मनु जैन ने सांगितले की कंपनी यावर्षी 6 स्मार्टफोंस लॉन्च करण्याची योजना बनवत आहे आणि सोबत 100 पेक्षा जास्त एक्सक्लूसिव स्टोर्स लॉन्च करण्याची पण योजना आहे.
त्यांनी सांगितले की कंपनी पुढच्या वर्षी अनेक सॉफ्टवेयर आणि इंटरनेट स्टार्ट-अप मध्ये भागीदारी करण्याची योजना बनवत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी भारतीय उद्योगांमध्ये 1 अरब डॉलर ची गुंतवणूक करण्याच्या आपल्या रणनीति अंतर्गत येणार्या काळात आपली गुंतवणुक वाढवण्याची तयारी करत आहे. जैन ने सांगितले "भारतात आमची आताशी सुरवात झाली आहे आणि आम्हाला अजून खुप काही मिळवायच आहे"
मागच्या महिन्यात, शाओमी चे संस्थापक आणि CEO, लेई जून ने कंपने च्या सर्व कर्मचार्यांना एका पत्रा मार्फत संबोधित केले. या पत्रात त्यांनी कंपनी च्या विस्तार योजनां बरोबर 2018 मध्ये शाओमी कडून कर्मचाऱ्यांची आणि ग्राहकांची काय अपेक्षा असू शकते याची माहिती दिली.
त्यांनी या पत्रात भारताबद्दल लिहिले आहे की, "भारत एक असाधारण उदाहरण आहे. अनेक शोध कंपन्यां नुसार, मागच्या वर्षी तिसर्या तिमाहीच्या सुरवाती पासून, भारताच्या स्मार्टफोन बाजारात आपला हिस्सा पहिल्या क्रमांकावर आला आहे."
शाओमी ने आधीच यावर्षी भारतात दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केल आहेत, Redmi Note 5 आणि Redmi Note 5 Pro. कंपनी ने आपल्या Mi TV के 3 वेरियंट ला पण भारतात लॉन्च केले आहे.