Xiaomi 25 एप्रिलला लॉन्च करू शकते हा नवीन स्मार्टफोन, दमदार असू शकतात याचे फीचर

Updated on 13-Apr-2018
HIGHLIGHTS

Xiaomi च्या या नव्या स्मार्टफोन बद्दल या हिंट वरून काहीच समोर नाही आले पण असा अंदाज व्यक्त होत आहे की हा डिवाइस Xiaomi Mi 6x नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.

Xiaomi ने आपल्या या स्मार्टफोन च्या लॉन्च साठी मीडिया इन्वाइट्‍स पाठवणे सुरू केले आहे, कंपनी 25 एप्रिलला चीन मध्ये आपल्या एका इवेंट चे आयोजन करून एक स्मार्टफोन सादर करेल. असे वाटत आहे की हा डिवाइस Xiaomi 6x असू शकतो. हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी TENAA वर दिसला होता. त्याचबरोबर कंपनी ने आपल्या एका वेइबो पोस्ट मध्ये ही बातमी टीज केली होती कि ते लवकरच एक प्रेस कांफ्रेंस करणार आहेत. 
पण या टीजर वरून स्मार्टफोन चे नाव काही समोर आले नाही. पण असा अंदाज लावला जात आहे की या इवेंट दरम्यान कंपनी आपला Xiaomi 6X स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोन बद्दल याआधी पण खुप काही समोर आले आहे. 
जर TENAA च्या लिस्टिंग वर नजर टाकली तर त्यातून समोर आले होते की स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह मिळू शकतो. तसेच लिस्टिंग याच्या रेड कलर वेरिएंट कडे पण इशारा करत आहे. 
फोन मध्ये एक ओक्टा-कोर प्रोसेसर असण्याची शक्यता आहे, ज्याचा 2.2GHz क्लॉक स्पीड असेल. पण अजुन पर्यंत चिपसेट बद्दल काही समोर आले नाही, अंदाज लावला जात आहे की या  डिवाइस मध्ये तुम्हाला एक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 किंवा स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर मिळू शकतो. त्याचबरोबर असे पण होऊ शकते की स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक हेलिओ P60 प्रोसेसर मिळू शकतो. या दोन्ही प्रोसेसर बद्दल अजूनतरी काहीही स्पष्ट झाले नाही. 

फोन मध्ये 4GB किंवा 6GB च्या रॅम सह 64GB किंवा 128GB ची इंटरनल स्टोरेज असू शकते, सोबत यात एक ड्यूल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन एंड्राइड 8.1 Oreo सह लॉन्च केला जाऊ शकतो, त्याचबरोबर यात एक 2910mAh क्षमता असलेली बॅटरी असण्याची शक्यता आहे. 
वाया:
नोट: फीचर्ड इमेज काल्पनिक आहे!
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :