Xiaomi : 24 हजारांचा 32 इंच स्मार्ट TV फक्त 11,000 रुपयांमध्ये खरेदी करा

Xiaomi : 24 हजारांचा 32 इंच स्मार्ट TV फक्त 11,000 रुपयांमध्ये खरेदी करा
HIGHLIGHTS

Xiaomi Smart TV 5A LED Android TV वर डिस्काउंट

Xiaomi Fan Festival 2023 दरम्यान सवलत

1,999 रुपये जादा दिले तर शाओमीचा स्मार्ट स्पीकरदेखील मिळेल.

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने आपल्या वेबसाईटवर Xiaomi Fan Festival 2023 सुरु केले आहे. दरम्यान, अनेक प्रोडक्ट्स कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, स्मार्ट TV फार कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत. तुम्ही Xiaomi Smart TV 5A LED Android TV खूप कमी किमतीत खरेदी करता येईल.   

Xiaomi Smart TV 5A LED Android TV किंमत आणि ऑफर्स 

हा TV 24,999 रुपयांऐवजी 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. मात्र, या TVवर ICICI क्रेडिट कार्डद्वारे डिस्काउंटदेखील मिळणार आहे. या कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास एक हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. या सह स्मार्ट TVची किमंत 11,999 रुपयांपर्यंत कमी होईल. 

याव्यतिरिक्त, 500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील तुम्हाला मिळणार आहे. यासह, फ्री डिलिव्हरी, फ्री इन्स्टॉलेशन सर्व्हिस आणि दहा दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी या सुविधादेखील मिळणार आहेत. जर तुम्ही 1,999 रुपये जादा दिले तर शाओमीचा स्मार्ट स्पीकरदेखील मिळेल. 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

 Mi 5A 32 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही Netflix, Amazon Prime, Disney Plus Hotstar आणि YouTube सपोर्टसह येतो. हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट बिल्ट सपोर्ट आहे. टीव्हीमध्ये 1366 x768 पिक्चर रिझोल्यूशनचा 32-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. तुम्हाला स्मार्ट टीव्हीमध्ये 20 W साउंड आउटपुट आणि 60 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo