आज दुपारी २ वाजल्यापासून सुरु होणार शाओमी रेडमी नोट 3 ची विक्री
ह्याला भारतात दोन स्टोरेज प्रकारात लाँच केले आहे 16GB आणि 32GB. ह्याची किंमत आहे क्रमश: ९,९९९ रुपये आणि११,९९९ रुपये आहे.
शाओमीने चीनमध्ये आपला आकर्षक स्मार्टफोन रेडमी नोट 3 अलीकडेच भारतात लाँच केला. कंपनीने ह्या स्मार्टफोनला जानेवारी मध्ये चीनमध्ये लाँच केले होते. हा स्मार्टफोन चीनमध्ये दोन वेरियंट्समध्ये लाँच केला होता, तेथेच दुस-या बाजूला लाँच झालेला हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650 ने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्याला भारतात दोन स्टोरेज प्रकारात लाँच केले आहे 16GB आणि 32GB. ह्याची किंमत आहे क्रमश: ९,९९९ रुपये आणि११,९९९ रुपये आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनला भारतात फ्लॅशसेलच्या माध्यमातून अॅमेझॉन इंडिया, Mi स्टोर्सवर दुपारी २ वाजल्यापासून खरेदी करु शकता.
शाओमी रेडमी नोट ३ स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांवाषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण IPS डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल. हा स्मार्टफोन पुर्णपणे मेटल यूनीबॉडीने बनला आहे. ह्याचे वजन केवळ १६४ ग्रॅम आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर दिले गेल आहे. असे पहिल्यांदाच घडत आहे की, भारतामध्ये ह्या प्रोसेसरमध्ये एखादा स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा एक हेक्सा कोर प्रोसेसर आहे, ज्यात २ कोर्टेक्स-A72 कोर्स आणि 4 कोर्टेक्स-A53 कोर्सने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये एड्रेनो ५१० GPU सुद्धा दिला गेला आहे. स्मार्टफोन दोन स्टोरेज प्रकारामध्ये म्हणजेच 6GB/32GB मध्ये मिळेल, ज्यात क्रमश: 2GB आणि 3GB चे रॅम दिले गेल आहे. हा स्मार्टफोन सिल्वर, डार्क ग्रे आणि गोल्ड रंगात उपलब्ध होईल.
त्याचबरोबर ह्यात १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा ड्यूल LED फ्लॅशसह दिला गेला आहे. जो आपल्याला फेज डिटेक्शन ऑटोफोकससह मिळत आहे. त्याशिवाय फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे, जो f/2.0 अॅपर्चरने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये 4050mAh क्षमतेची नॉन-रिमूव्हेबल बॅटरीसुद्धा असू शकते, जो फास्ट चार्जिंग सपोर्टसह आपल्याला मिळत आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे. तसेच शाओमी पुढील महिन्यात भारतात आपला दुसरा स्मार्टफोन शाओमी Mi 5 लाँच करण्याच्या तयारीत आहे. ह्या स्मार्टफोनला अलीकडेच MWC 2016 मध्ये लाँच केले गेेले होते. कंपनीचे म्हणणे आहे की, हा 5.5 इंचाचा आयफोन 6S पेक्षा जवळपास १४ ग्रॅम हलका आहे आणि त्यापेक्षा खूप चांगला सुद्धा आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 5.15 इंचाची FHD 1080×1920 पिक्सेलची 3D कर्व्ह्ड सेरामिक ग्लास डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याची पिक्सेल तीव्रता 428ppi आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह एड्रेनो 530 GPU सुद्धा दिला गेला आहे.
शाओमी Mi 5 मध्ये फोटोग्राफीसाठी १६ मेगापिक्सेलचा सोनी IMX298 कॅमेरा सेंसर दिला आहे. ज्यात PDAF आणि LED फ्लॅश दिला आहे. त्याशिवाय ह्या रियर कॅमे-यामध्ये 4-axis OIS आणि सफायर ग्लास प्रोटेक्शन लेन्स दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 4K व्हिडियो रेकॉर्डिंग करु शकतो. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये ४ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.
हेदेखील वाचा – अखेरीस भारतात लाँच झाले सॅमसंग गॅलेक्सी S7 आणि S7 एज स्मार्टफोन्स