शाओमी ने भारतात आपला पहिला Mi होम एक्सपीरियंस स्टोर सुरू केला आहे, हा चेन्नई च्या वेलाचेरी मधील फीनिक्स मार्केट सिटी मॉल मध्ये आहे. हा कंपनी चा 25वा Mi होम स्टोर आहे आणि 1 मार्च 2018 पासून हा ग्राहकांसाठी खुला करण्यात येईल. या स्टोर मध्ये Xiaomi त्या प्रोडक्ट्स ना प्रदर्शित करेल, जे आता पर्यंत भारतात लॉन्च झाले नाहीत, जसे Mi केटल, Mi बाइक, Mi राइस कुकर, Mi नाइनबोट आणि दूसरे अनेक प्रोडक्ट्स.
घोषणा करताना, शाओमी इंडिया चे उपाध्यक्ष आणि निर्देशक मनु जैन ने सांगितले, "आम्ही Mi होम एक्सपीरियंस स्टोर ला भारतात आणण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही नेहमीच आमच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांना महत्व दिले आहे. त्यासोबत हे आमच्या ऑफलाइन उपस्थिति ला मजबूत करण्याच्या आमच्या विजन ला साकार करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाउल आहे."
शाओमी चा उद्देश्य वर्ष 2018 च्या शेवटापर्यंत भारतात 100 Mi होम स्टोर्स सुरू करण्याचा आहे, जे ग्राहकांना प्रोडक्ट्स चा अनुभव, मूल्यांकन आणि खरेदी करण्यास मदत करतील. नवीन स्टोर काही अश्या प्रोडक्ट्स चे प्रदर्शन करत आहे, जे अजूनपर्यंत देशात उपलब्ध झाले नाहीत. जसे वॉटर प्यूरिफॉयर, पोर्टेबल एयर प्यूरिफॉयर, लॅपटॉप, राइस कुकर, रोबोट वॅक्यूम क्लीनर आणि ईतर. कंपनी लवकरच दिल्ली आणि मुंबई मध्ये 2 नवीन Mi होम एक्सपीरियंस स्टोर सुरू करण्याच्या तयारीत आहे.